scorecardresearch

Siddharth Malhotra-Kiara Advani Wedding : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो अखेर समोर

नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याची झलक दाखवली आहे.

Siddharth Malhotra-Kiara Advani Wedding photos 1
सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी आज ७ फेब्रुवारी लग्नबंधनात अडकले. राजस्थानच्या जैसलमेर या ठिकाणी असलेल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये त्या दोघांनी सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली. आता त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. नुकतंच त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची झलक दाखवली आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. “आता आमची कायमस्वरुपी बुकींग झाली आहे. आमच्या पुढील वाटचालीसाठी तुमचे आशीर्वाद आणि प्रेम राहू द्या”, असे कॅप्शन त्याने हे फोटो शेअर करताना दिले आहे.
आणखी वाचा : Siddharth Malhotra-Kiara Advani Wedding : शुभमंगल सावधान! लग्नबंधनात अडकले सिद्धार्थ-कियारा; अडवाणींची लेक झाली मल्होत्रांच्या घरची सून

सिद्धार्थने शेअर केलेल्या या फोटोत ते दोघेही फारच गोड दिसत आहेत. यावेळी सिद्धार्थने गोल्डन रंगाची शेरवानी, फेटा असा लूक केल्याचे दिसत आहे. तर कियाराने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. याबरोबर तिने हिरव्या रंगाचा नेकलेस, बिंदी असा लूक केला होता. यावेळी ते दोघेही नववधू-वराच्या वेशात फारच छान दिसत होते.

आणखी वाचा : Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding : ८४ खोल्या, ९२ बेडरुम, व्हिला, पूल अन्…; सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नासाठी एका दिवसाचे भाडे किती?

सिद्धार्थने शेअर केलेल्या पहिल्या फोटो ते दोघेही एकमेकांसमोर हात जोडून हसताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ते दोघेही एकमेकांकडे पाहून स्मितहास्य करत आहेत. तर आणखाी एका फोटोत कियारा ही सिद्धार्थच्या गालावर किस करताना पाहायला मिळत आहे.

दरम्यान आज मंगळवारी ७ फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि कियाराने सप्तपदी घेतली. सिद्धार्थ कियाराच्या अफेअरची चर्चा खूप दिवसांपासून सुरू होती. पण दोघांनीही कधीच त्यांच्या नात्याची कबुली दिली नव्हती. आता मात्र ते दोघेही लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले आहेत. राजस्थानच्या सूर्यगढ पॅलेसमध्येच त्यांच्या लग्नाचे विधी पार पडले.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 22:50 IST