scorecardresearch

Premium

“लग्न हा एक खेळ” अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा असं का म्हणाला?, पाहा व्हायरल व्हिडीओ

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा नवा व्हिडीओ व्हायरल, लग्नानंतरच्या जीवनाबाबत म्हणाला…

Sidharth Malhotra Kiara Advani
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा नवा व्हिडीओ व्हायरल, लग्नानंतरच्या जीवनाबाबत म्हणाला… (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी हे बॉलीवूडमधील क्यूट कपलपैकी एक आहेत. फेब्रुवारी २०२३ मध्ये सिद्धार्थ-कियारा लग्नबंधनात अडकले. तेव्हापासून हे कपल चांगलंच चर्चेत आहे. नुकताच सिद्धार्थचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो लग्नानंतरच्या जीवनाबाबत सांगताना दिसतं आहे. यावेळेस सिद्धार्थनं पत्नी कियाराला ‘जीवनातील मौल्यवान खजिना’ची उपमा दिली आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्रावर पेजवर सिद्धार्थचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच सिद्धार्थ जीवनातला सर्वात मौल्यवान खजिना कियारा असल्याचं सांगताना दिसत आहे. तसंच तो पुढे म्हणतो की, “आताच लग्न झालं. मी खूप आनंदी आहे. लग्न हा एक खेळ आहे. हा खेळ आम्ही आमच्या आयुष्यात दोघंजण रोज खेळतो. गेल्या काही महिन्यात मला हे देखील समजलंय की, लग्नानंतर कधी ‘मी किंवा माझं’ असं नसतं. तेव्हा फक्त ‘आपलं’ असं असतं. हेच लग्नानंतरचं जीवन असतं.”

a man looking like mithun chakraborty
VIDEO : सेम टू सेम मिथुन चक्रवर्तीसारखा दिसतोय? व्हिडीओ पाहून तुम्हीही चक्रावाल
aishwarya rai
Video: लहान मुलगा बोबड्या बोलात म्हणाला ‘ऐश्वल्या लाय’, अभिनेत्रीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल
actress prarthana behere previously working as a tv reporter
“त्यांनी मला मारलंच असतं…”, अभिनेत्री होण्याआधी प्रार्थना बेहरे होती पत्रकार, संजय दत्तला विचारलेला ‘तो’ प्रश्न, म्हणाली…
siddharth chandekar and mitali mayekar
Video : “…म्हणे मी मोठी झालीये!”, सिद्धार्थ चांदेकरने शेअर केला बायको मितालीचा मजेशीर व्हिडीओ

हेही वाचा – ओटीटीवर पदार्पण करणारी नर्गिस फाखरी चर्चेत; म्हणाली, “मी कोणत्याही प्रोजेक्टसाठी नग्न…”

हेही वाचा – महेंद्रसिंग धोनीच्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का? ‘या’ दिवशी चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

सिद्धार्थच्या या व्हिडीओनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, ‘ईश्वराचे आशीर्वाद सदैव तुमच्या दोघांवर असू दे.’ तर दुसऱ्या नेटकऱ्यानं सिद्धार्थ-कियाराला त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – अभिनेते गिरीश कुलकर्णी सोशल मीडियाचा वापर का करत नाहीत? म्हणाले, “फॉलो…”

दरम्यान, सिद्धार्थ व कियारानं ‘शेरशाह’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं आणि त्यावेळेस दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. अलीकडेच ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी कियारा सिद्धार्थबाबत म्हणाली की, “मी खूप नशीबवान आहे. कारण जो माझा जोडीदार आहे, ज्याला मी माझ्याबरोबर संपूर्ण आयुष्य जगण्यासाठी निवडलं आहे, जो माझा नवरा आहे, तोच माझा सर्वात चांगला मित्र आहे. तो माझ्यासाठी सर्वकाही आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sidharth malhotra calls marriage a game and kiara advani his most prized treasure video viral pps

First published on: 11-07-2023 at 19:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×