बॉलिवूडमधील सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी ही लोकप्रिय जोडी त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. ७ फेब्रुवारीला कियारा आणि सिद्धार्थ लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा थाटामाटात पार पडणार आहे.

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाबाबत रोज नवी माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांच्या लग्नापूर्वीच्या संगीत, मेहेंदी व हळदी कार्यक्रमांना आजपासून सुरुवात होणार आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सिद्धार्थ-कियाराच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावणार आहेत. पाहुण्यांसाठी आलिशान पॅलेसमधील ८४ खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे. याशिवाय पाहुण्यांच्या सुरक्षिततेचाही चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

how eating onions included food in summer helps to beat the heatwaves
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा कसा ठरतो फायदेशीर; जाणून घ्या उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Somalias Pirates Stock Market in Harardhere
वित्तरंजन : भांडवली बाजारच; पण कुणाचा?
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी

हेही वाचा>> भारताच्या नकाशावर पाय दिल्याने अक्षय कुमार ट्रोल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

हेही वाचा>> Video: सिद्धार्थ-कियाराचा बॉलिवूड गाण्यांवर डान्स; पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नासाठी सूर्यगढ पॅलेसमध्ये जय्यत तयारी करण्यात येत आहे. पॅलेसमधील सजावटीचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील मेन्यूबद्दल माहिती समोर आली आहे. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नात पाहुण्यांसाठी खास पंजाबी व राजस्थानी पदार्थ असणार आहेत. याशिवाय आठ प्रकारचा दाल-बाटी चूरमा, २० प्रकारचे गोड पदार्थ आणि चायनीज, थाई, कोरियन पदार्थांची मेजवानी असणार आहे.

सिद्धार्थ-कियारा गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. शेरशाह चित्रपटातील त्यांच्या ऑन स्क्रीन जोडीला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली होती. आता हे रील लाइफ कपल खऱ्या आयुष्यात विवाहबंधनात अडकत असल्यामुळे चाहतेही खूश आहेत.