....म्हणून सिद्धार्थ-कियाराचा संगीत सोहळा अचानक थांबवावा लागला, नेमकं काय घडलं? | Sidharth malhotra kiara advani wedding stop between father health in sangeet ceremony nrp 97 | Loksatta

….म्हणून सिद्धार्थ-कियाराचा संगीत सोहळा अचानक थांबवावा लागला, नेमकं काय घडलं?

सोमवारी ६ फेब्रुवारीला सूर्यगढ पॅलेसमध्ये संगीताचा कार्यक्रम सुरू होता.

Sidharth-Malhotra

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी अखेर विवाहबद्ध झाले आहेत. राजस्थान जैसलमेर या ठिकाणी असलेल्या सूर्यगढ पॅलेस त्या दोघांनी सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली. रविवारी ५ फेब्रुवारीपासून सिद्धार्थ-कियारा यांच्या विवाहापूर्वीच्या सभारंभांना सुरुवात झाली होती. मात्र याच दरम्यान सिद्धार्थचे वडील सुनील मल्होत्रा ​​यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी ६ फेब्रुवारीला सूर्यगढ पॅलेसमध्ये संगीताचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी अचानक सिद्धार्थचे वडील सुनील मल्होत्राची यांची तब्येत बिघडली. त्यांना अचानक उलट्या सुरु झाल्या. त्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ डॉक्टरांना बोलवलं आणि त्यांची तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांना २ तास विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला.
आणखी वाचा : Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding : ८४ खोल्या, ९२ बेडरुम, व्हिला, पूल अन्…; सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नासाठी एका दिवसाचे भाडे किती?

सिद्धार्थचे वडील सुनील मल्होत्रा यांनी विश्रांती घेतल्यानतंर त्यांना बरं वाटलं. यानंतर सिद्धार्थ-कियाराच्या संगीत कार्यक्रम पुन्हा सुरु करण्यात आला. रात्री जवळपास अडीच वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरु होता. यावेळी वधू-वरासह सर्वच पाहुण्यांनी धमाल केली.

आणखी वाचा : Video : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीच्या संगीत सोहळ्यात ‘या’ बॉलिवूड गाण्यावर थिरकले कलाकार, पाहा व्हिडीओ

यानंतर आज मंगळवारी ७ फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि कियाराने सप्तपदी घेतली. सिद्धार्थ कियाराच्या अफेअरची चर्चा खूप दिवसांपासून सुरू होती. पण दोघांनीही कधीच त्यांच्या नात्याची कबुली दिली नव्हती. पण आता मात्र ते दोघेही लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले आहेत. विशेष म्हणजे आजच संध्याकाळी त्यांचा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सूर्यगढ पॅलेसमध्येच हा रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 19:17 IST
Next Story
“माझ्या मांड्या…” बॉडी शेमिंगबद्दल रवीना टंडनचा धक्कादायक खुलासा