Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding : सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचा शाही थाट, संगीत पार्टीचा पहिला व्हिडीओ समोर | sidharth malhotra kiara advani wedding update sangeet ceremony video social media nrp 97 | Loksatta

Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding : सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचा शाही थाट, संगीत पार्टीचा पहिला व्हिडीओ समोर

कियारा- सिद्धार्थच्या संगीत पार्टीचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.

sidharth malhotra kiara advani sangeet
कियारा- सिद्धार्थच्या संगीत पार्टीचा पहिला व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा येत्या ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. कियारा आणि सिद्धार्थ डेस्टिनेशन वेडींग करणार असून त्यासाठी त्यांनी राजस्थानमधील जैसलमेर ही जागा निवडली आहे. या शाही विवाहसोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यातच आता कियारा- सिद्धार्थच्या संगीत पार्टीचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाची तयारी सध्या फार धामधुमीत सुरु आहे. त्या दोघांच्या लग्नाला संपूर्ण बॉलिवूड उपस्थित राहणार आहे. करण जोहर, मनीष मल्होत्रा, शाहिद कपूर आणि मीरा कपूर यांसह अनेक कलाकार हे जैसलमेरला पोहोचले. विशेष म्हणजे कियारा अडवाणीची खास मैत्रीण असलेली ईशा अंबानीही या लग्नात सहभागी होणार आहे. यावेळी पाहुण्यांच्या स्वागतासाठी राजस्थानी लोकनृत्य कलाकारांची व्यवस्था करण्यात आल्याचे बोललं जात आहे.
आणखी वाचा : Video : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीची लगीनघाई, सूनबाईंबद्दल प्रश्न विचारताच आईने केले असं काही…

सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाची तयारी सुरु असताना आता त्यांच्या संगीत कार्यक्रमातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत संगीत कार्यक्रमाची तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी अनेक मोठमोठे झुंबर, पाहुण्यांची बैठक व्यवस्था आणि मध्यभागी उभारण्यात आलेला स्टेज पाहायला मिळत आहे.

राजस्थानच्या सूर्यगढ पॅलेसमधील एका ठिकाणी संगीतसाठी मंडप उभारण्यात येत असल्याचे यात दिसत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या संगीत कार्यक्रमात डान्स केल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून लगीनघाई सुरु आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्यापाठोपाठ आता आणखी एक बहुचर्चित कपल लग्नगाठ बांधणार आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने येत आहे. मात्र याबद्दल कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

आणखी वाचा :‘शेरशाह’च्या सेटवर नाही तर ‘या’ कारणाने झाली होती सिद्धार्थ-कियाराची पहिली भेट, नंतर ‘अशी’ सुरु झाली लव्हस्टोरी

सूर्यगढ पॅलेसवरील लक्झरी व्हिला कियारा-सिद्धार्थने बुक केला आहे. या व्हिलामध्ये तब्बल ८४ खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे. तर पाहुण्यांसाठी ७० गाड्याही बुक करण्यात आल्या आहेत. सूर्यगढ पॅलेसवरील एका दिवसाचं भाडं एक ते दोन कोटींच्या घरात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 08:11 IST
Next Story
“विवाहित महिलेला डेट करण्यात…” जेलमध्ये असलेल्या सुकेश चंद्रशेखरचा धक्कादायक खुलासा