scorecardresearch

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाची तारीख ठरली? अभिनेता २० तारखेचा उल्लेख करत म्हणाला…

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही लग्न कधी करणार याबाबत सिद्धार्थला विचारण्यात आलं होतं.

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाची तारीख ठरली? अभिनेता २० तारखेचा उल्लेख करत म्हणाला…
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरू आहे. सध्या केएल राहुल – अथिया शेट्टी व सिद्धार्थ मल्होत्रा- कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या चर्चा जोरात सुरू आहेत. या दोन्ही जोड्या लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जातंय. तसे संकेत या कलाकारांनीही दिले आहेत, मात्र तारीख अद्याप ठरलेली नाही. त्यातच सिद्धार्थ-कियारा दोघेही चंदीगडमध्ये लग्न करणार असल्याचे मीडिया रिपोर्ट्स आले होते. दोघेही फेब्रुवारीमध्ये लग्न करतील, अशा शक्यताही वर्तवल्या जात होत्या. आता सिद्धार्थलाच त्याच्या लग्नाच्या तारखेबद्दल विचारण्यात आलंय.

उर्फी जावेदने पुन्हा केलं ट्वीट, स्वत:च्या अंतर्वस्त्राचा उल्लेख करत म्हणाली, “…चित्रा वाघ ग्रेट है”

कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी त्यांचं नातंही जाहीरपणे स्वीकारलं आहे. अशातच सिद्धार्थला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारण्यात आलं. “मी खूप उत्साही अभिनेता आहे. माझ्यासाठी माझे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य सारखेच आहे. आत्तासाठी, माझे मिशन हे (मिशन मजनू) २० जानेवारीसाठी आहे. त्यानंतर आपण भेटलो तर मी तुम्ही विचारताय त्याबद्दल सांगेन,” असं सिद्धार्थ ट्रेलर लाँचच्या वेळी म्हणाला.

तगडी शरीरयष्टी, कुरळे केस अन् हटके स्टाईल, ‘या’ अभिनेत्याला ओळखलंत का?

सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या आणि कियाराच्या नात्याबद्दल मौन बाळगतो. तर, कियारा अडवाणीने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये ती आणि सिद्धार्थ एकमेकांचे फक्त मित्र नसून त्यापेक्षा जास्त आहेत, असं म्हटलं होतं. सिद्धार्थ आणि कियाराने ‘शेरशाह’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि दोघेही लग्न करणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 08:57 IST

संबंधित बातम्या