Sidharth Malhotra suffers leg injury: सध्या सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या ‘द वान: फोर्स ऑफ द फॉरेस्ट'(he Vvaan: Force of the Forest) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून सध्या द वान: फोर्स ऑफ द फॉरेस्टचे कौतुक होत आहे. आता मात्र त्याच्या सिनेामामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे तो चर्चेत आला आहे.

सिद्धार्थ मल्होत्राच्या पायाला दुखापत

सिद्धार्थ मल्होत्राच्या पायाला दुखापत झाली आहे. सिद्धार्थने नुकताच सोशल मीडियावर त्याच्या दुखापत झालेल्या पायाचा फोटो शेअर केला आहे. सिद्धार्थ मल्होत्राने मंगळवारी त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पायाचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये त्याच्या दुखापत झालेल्या पायाला वॉकिंग बूट लावल्याचं पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्याने मजेशीर कॅप्शनही दिलं. “ब्रेक अ लेग ही म्हण मी जरा जास्तच मनावर घेतली”, अशी कॅप्शनही त्याने दिली आहे.

सिद्धार्थ मल्होत्राच्या पायला दुखापत (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

सिद्धार्थने या पोस्टमध्ये त्याच्या पायाला नेमकी कशी दुखापत झाली याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, नुकताच अंबानी कुटुंबाचा एक कार्यक्रम जामनगरमध्ये पार पडला. या कार्यक्रमातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ त्याच्या पायाला कशी दुखापत झाली याबद्दल सांगताना दिसत आहे.

सिद्धार्थ म्हणाला, “तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. मला तुमच्याबरोबर भरपूर डान्स करायचा होता, गाणी गायची होती आणि उड्या मारायच्या होत्या. पण, काही वेळापूर्वी मी माझ्या परफॉर्मन्सची तयारी करत होतो त्यावेळी उत्साहात मी जरा जास्तच उड्या मारल्या, त्यामुळे माझ्या पायाला दुखापत झाली आणि मला दवाखान्यात जावं लागलं.”

दरम्यान, सिद्धार्थ व कियारा गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी फोटो शेअर करत दुसऱ्यांदा पालक होणार असल्याची आनंदाची बातमी शेअर केली होती.