scorecardresearch

“हे अजिबात सोप्पं नव्हतं, तब्बल १८ वर्षं…” भारताचं नागरिकत्व स्वीकारण्याबाबत अदनान सामीचा खुलासा

भारताचं नागरिकत्व आणि कमी केलेलं वजन यामुळे तो मध्यंतरी चांगलाच चर्चेत होता

“हे अजिबात सोप्पं नव्हतं, तब्बल १८ वर्षं…” भारताचं नागरिकत्व स्वीकारण्याबाबत अदनान सामीचा खुलासा
फोटो : इंडियन एक्सप्रेस

‘मुझको भी तो लिफ्ट करा दे’ या गाण्यामुळे लोकप्रिय झालेला गायक अदनान सामीला कोण ओळखत नाही? भारतात जेव्हा पॉप कल्चर रुजायला सुरुवात झाली तेव्हाच्या पहिल्या फळीतील गायक आणि संगीतकार म्हणजेच अदनान सामी. तो उत्कृष्ट गायक आणि संगीतकार आहेच याशिवाय तो उत्करूष कीबोर्ड प्लेयरसुद्धा आहे. मध्यंतरी त्याने स्वीकारलेलं भारताचं नागरिकत्व आणि कमी केलेलं वजन यामुळे तो चांगलाच चर्चेत आला होता.

नुकतंच त्याने युट्यूबवरील ‘द बॉम्बे जर्नी’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये त्याने स्वतःच्या कारकीर्दीबद्दल खुलासा केला शिवाय भारताचं नागरिकत्व घेतानाचा त्याचा अनुभव त्याने शेअर केला आहे. लोकांना जेवढं पेपरात वाचण्याइतकं सोप्पं वाटतं तेवढं देशाचं नागरिकत्व घेणं सोप्पं नाही असाही अदनानने या मुलाखतीमध्ये खुलासा केला.

आणखी वाचा : रक्ताने माखलेले कपडे, कुऱ्हाड अन् ओठात सिगारेट; रणबीरच्या ‘ॲनिमल’चं पोस्टर पाहून चाहत्यांनी केली पुष्पाशी तुलना

अदनान म्हणाला, “लोकांना वाटतं मी सेलिब्रिटी आहे म्हणून मला सगळ्या गोष्टी खूप सहज मिळतात, तसं सहज मिळण्यासारखं काहीच नसतं. त्यासाठी मला बराच काळ थांबावं लागलं. लोकांसाठी ती पेपरमधील ब्रेकिंग न्यूज होती, पण हे नागरिकत्व मिळेपर्यंत तब्बल एक वर्षं माझ्याकडे कोणत्याच देशाचं नागरिकत्व नव्हतं.”

पुढे याविषयी खुलासा करताना अदनान म्हणाला, “यासाठी मला तब्बल १८ वर्षं लागली. पण या १८ वर्षात मी याबद्दल कुठेही एक चकार शब्दसुद्धा काढलेला नाही. मला भारतीय नागरिकता दोनवेळा नाकारण्यात आली होती. मी माझं मूळचं नागरिकत्व सोडल्याने काही काळ ‘स्टेटलेस’ होतो. पासपोर्ट हा फक्त दाखवायला होता, मी माझ्या आधीच्या देशात जाऊ शकत नव्हतो, मी कुठेही प्रवास करू शकत नव्हतो.” अदनान सामीचा जन्म इंग्लंडमध्ये झाला, त्याचे पालक पाकिस्तानी असल्याने त्याच्याकडे पाकिस्तानचं नागरिकत्व होतं. २००१ मध्ये अदनानने भारतात पाऊल ठेवलं आणि २०१६ मध्ये त्याला भारतीत नागरीकता मिळाली.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2023 at 10:22 IST

संबंधित बातम्या