तमिळ गायिका चिन्मयी श्रीपदाने तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्याकडे गीतकार वैरामुथूवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मीटू चळवळीदरम्यान अनेक महिलांनी वैरामुथू यांच्यावर आरोप केले होते, पण त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे चिन्मयीने ट्वीट करत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं, असं म्हटलं आहे. द्रमुक पक्षाचे सदस्य आणि स्टॅलिनच्या जवळच्या लोकांनी या मुद्द्यावर तिला गप्प करण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही चिन्मयीने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“एखाद्या मुस्लीम नेत्याने…”, नसीरुद्दीन शाहांची पंतप्रधान मोदींवर टीका; निवडणूक आयोगालाही सुनावले खडे बोल

“आदरणीय मुख्यमंत्री, भारतात कुठेही जेव्हा लैंगिक छळाची घटना उघडकीस येते, तेव्हा तुम्ही त्यांना न्याय मिळण्याची मागणी करता, त्यांना पाठिंबा देता ही चांगली गोष्ट आहे. कारण जेव्हा राजकीय नेते बोलतात, तेव्हा बदलाची आशा असते. पण, अनेक उद्योगांमध्ये विशेषत: चित्रपट उद्योगात ICC किंवा POCSO सारखी कोणतीही सिस्टिम नाही. १७ पेक्षा जास्त महिलांनी तुमचे जवळचे मित्र वैरामुथू यांच्यावर आरोप केले आहेत, पण ते तुमच्या जवळचे असल्याचा गैरफायदा घेत आहेत, त्याचा वापर ते समोर येऊन बोलणाऱ्या महिलांना शांत करण्यासाठी करतात. तामिळनाडूतील इतर राजकारण्यांप्रमाणेच तुमचा पक्षही त्यांना प्लॅटफॉर्म देत आहे.”

“नकाब घालून जेवण करणं ही…”, इस्लामसाठी बॉलिवूड सोडणाऱ्या झायरा वसीमचं ट्वीट चर्चेत

चिन्मयी पुढे म्हणाली, “तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये माझ्यावर जवळपास पाच वर्षे बंदी घालण्यात आली होती, मी कोर्टात लढले आहे. आमच्या ओळखी नसतील तर या देशात न्याय मिळण्यासाठी आणखी २० वर्षे लागू शकतात, हे समजून लढण्याची माझ्यात ताकद आहे. मी २०१८-१९ राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली, कारण हाच एकमेव पर्याय होता. तपासासाठी घरी आलेल्या पोलिसांना मी तक्रार दिली. माझ्याकडे फोन कॉल रेकॉर्डसह पुरेसे पुरावे आहेत, ज्यात वैरामुथूने तडजोड करण्यास म्हटलंय. याप्रकरणी मी त्यांचा मुलगा मदन कार्कीलाही कळवलं, त्याने उत्तर देत वडिलांच्या वर्तणुकीची कुटुंबाला माहिती असल्याचं मान्य केलं होतं. वैरामुथू आणि ब्रिजभूषण यांच्यासाठी नियम वेगळे असू शकत नाहीत.”

चिन्मयीने या मुद्द्याची तुलना दिल्लीतील कुस्तीपटूंच्या आंदोलनाशी केली. “आमच्या चॅम्पियन कुस्तीपटूंनी आणि एका अल्पवयीन मुलीने ब्रिज भूषणवर आरोप केले आहेत. १७ पेक्षा जास्त महिलांनी वैरामुथूवर आरोप केले आहेत. त्यांनी मला आणि इतरांना गप्प करण्यासाठी, प्रतिभावान व स्वप्नं पाहणाऱ्या महिलांचे करिअर खराब करण्यासाठी तुमचा पक्ष आणि तुमच्याशी असलेल्या जवळीकतेचा वापर केला आहे. त्याची प्रतिभा आपल्या सर्वांपेक्षा मोठी नाही,” असं चिन्मयी म्हणाली.

“हे तुमच्या नाकाखाली होत आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये ठिकाणं अजून सुरक्षित होऊ शकतील, यासाठी काम करा. वैरामुथूच्या राजकीय संबंधांमुळे त्याच्याविरोधात बोलण्यास लोक घाबरतात. अनेक महिला आणि पुरुषांना टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रात लैंगिक छळाचा सामना करावा लागतो, त्यासाठी एक सिस्टिम तयार करा,” अशी विनंती चिन्मयीने केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer chinmayi sripaada requests tamil nadu cm m k stalin to take action against lyricist vairamuthu hrc
First published on: 30-05-2023 at 09:03 IST