परिणीती चोप्रा-राघव चड्ढांना ‘आप’ खासदारानंतर प्रसिद्ध गायकाकडूनही शुभेच्छा; म्हणाला, “मी पहिलाच..”

Raghav Chadha Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढांचं लग्न ठरलं? आप खासदारानंतर परिणीतीच्या जवळच्या व्यक्तीकडून शिक्कामोर्तब

parineeti-chopra-raghav-chadha-news
परिणीती चोप्रा-राघव चड्ढांच्या नात्यावर शिक्कामोर्तब

Raghav Chadha Parineeti Chopra Relationship: अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या अफेअरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. दोघांच्या नात्याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांची बोलणीही सुरू असल्याची माहिती समोर आली होती. या दोघांच्या नात्यावर आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करून शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर आता प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता हार्डी संधूनेही दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हेही वाचा- अजय देवगणच्या ‘भोला’चा बॉक्स ऑफिसवर डंका; पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

डीएनएला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हार्डीने सांगितले की, परिणीती शेवटी आयुष्यात स्थिरावत आहे याचा आनंद आहे. “अखेर हे घडत असल्याने मला खूप आनंद होत आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. जेव्हा तो त्याच्या २०२२ च्या स्पाय-थ्रिलर ‘कोड नेम: तिरंगा’ चे शूटिंग करत होता तेव्हा माझ्यात आणि परिणीतीत लग्नाबद्दल चर्चा झाली होती. तेव्हा ती नेहमी म्हणायची की जेव्हा मला वाटेल की मला योग्य व्यक्ती मिळाली आहे तेव्हाच मी लग्न करेन. हार्डीने परिणीतीला फोन करुन शुभेच्छा दिल्याचेही सांगितले.

हेही वाचा- अजय देवगणच्या ‘भोला’चा बॉक्स ऑफिसवर डंका; पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

राघव आणि परिणिती या दोघांनीही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतले आहे आणि त्यांचे अनेक कॉमन मित्र आहेत. एका रिपोर्टनुसार त्यांच्या कुटुंबियांनी लग्नाबद्दल बोलणी सुरू केली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधील एका वृत्तानुसार, परिणीती व राघव या दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाबाबत चर्चा सुरू केली आहे. आप खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करून या दोघांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

हेही वाचा- शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला करोनाची लागण, नेटकऱ्यांनी मात्र आजारपणाची उडवली खिल्ली, म्हणाले, “पूर्ण तोंड…”

लग्नाच्या अफवांदरम्यान अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा बुधवारी रात्री दिल्ली विमानतळावर एकत्र दिसले. यावेळी पत्रकारांना टाळून परिणीती घाईघाईने कारमध्ये शिरताना दिसली. तिने काळ्या रंगाचे कपडे घातले होते. राघव चड्ढाही तिच्याबरोबर होते, नंतर तेही घाईघाईने कारमध्ये बसून निघून गेले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 09:53 IST
Next Story
अजय देवगणच्या ‘भोला’चा बॉक्स ऑफिसवर डंका; पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
Exit mobile version