बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगम आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना सोमवारी (२० फेब्रुवारी) मुंबईतील एक कॉन्सर्टदरम्यान धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. या घटनेचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर आता सोनू निगमचा या कार्यक्रमातील त्या घटनेदरम्यानचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात या घटनेवेळी नेमकं काय घडलं, हे स्पष्ट दिसत आहे.

प्रसिद्ध गायक सोनू निगम हा सध्या चर्चेत आहे. सोनू निगमने सोमवारी (२० फेब्रुवारी) चेंबूर येथील एका संगीत कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्याचे काही सहकारीही तिथे उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी सोनू निगमने विविध गाणी म्हटली. यानंतर स्टेजवरुन खाली उतरत असताना सोनू निगमसह त्याच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की झाली. ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांचे पुत्र स्वप्नील फातर्पेकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांवर सोनू निगमला धक्काबुक्की करण्याचा आरोप आहे.
आणखी वाचा : Video : धक्काबुक्कीच्या घटनेनंतर पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आला सोनू निगम, तब्येतीबाबत माहिती देत म्हणाला…

IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
young woman saved a caged dog in a burning building shocking video goes viral on social media
जीवाची पर्वा न करता तरुणीने वाचवला पेटत्या इमारतीमध्ये फसलेल्या कुत्र्याचा जीव, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
delivery boy slept on his bike,
“थकलेल्या जीवाला सावलीचा विसावा”, कडक उन्हात रस्त्याच्या कडेला दुचाकीवरच झोपला डिलिव्हरी बॉय! Video Viral
Tge angry cow chases two motorcycle riders near a Fuel Staion and apparently tries to harm them, luckily the riders get a way safely video viral
खतरनाक! गायीने दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेवर केला हल्ला; ‘हा’ Video पाहून थरकाप उडेल

स्वप्नील फातर्पेकर यांनी सोनू निगमला पकडून त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांच्या सुरक्षारक्षकांशी बाचाबाची झाली. या प्रयत्नात सोनू निगमबरोबर असणाऱ्या काही व्यक्तींना धक्काबुक्की झाली. एक व्यक्ती खालीही पडली. खुद्द सोनू निगमलाही धक्काबुक्की झाल्याचा दावा त्यांनी स्वत: केला आहे. सोनू निगमनं यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणानंतर आता याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओत नेमकं काय घडलं हे स्पष्टपणे दिसत आहे. सोनू निगम हे खाली उतरत त्यांना धक्काबुक्की झाल्याचे दिसत आहे. त्यावेळी स्वप्नील फातर्पेकर हे देखील तिथे उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणानंतर या महोत्सवाचे आयोजक हे सोनू निगम यांना घेऊन जाताना दिसत आहेत.

दरम्यान या प्रकरणानंतर घडलेल्या प्रकरणाबद्दल सोनू निगमने स्पष्टीकरण दिले आहे. “काहीही झालेलं नाही. कॉन्सर्ट झाल्यावर मी स्टेजवरून खाली उतरत होतो. आजकाल सेल्फी आणि फोटोग्राफचे जे प्रकार सुरू आहेत त्यात कोणीही समजून घेत नाही. स्वप्निल नावाच्या व्यक्तीने मला पकडलं. त्याचं नाव मला नंतर माहिती झालं. त्याने मला पकडलं, तर पहिल्यांदा मला वाचवायला हरिप्रकाश आले. त्याने हरीला धक्का दिला.”

“त्यानंतर मला धक्का दिला. त्यामुळे मीही पडलो. व्हिडीओत मीही स्टेजवर खाली पडताना दिसत आहे. बाजूला असतो, तर मी स्टेजच्या खाली पडलो असतो. त्यावेळी मला वाचवण्यासाठी रब्बानी आले. रब्बानींना तर त्याने जोरात धक्का दिला आणि ते मागे आदळले. वाचले, नाहीतर जीवच गेला असता. त्यांच्या मागे लोखंड असतं, तर त्यांचा मृत्यू झाला असता.” असे सोनू निगम म्हणाला.