अक्षय कुमारने २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त 'स्काय फोर्स' नावाच्या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात अक्षय कुमारबरोबरच आणखी एका नवोदित चेहऱ्याने लक्ष वेधून घेतलं. या अभिनेत्याचं नाव आहे वीर पहारिया. अक्षय कुमारबरोबर बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा वीर नक्की कोण आहे, हे जाणून घेऊयात. “वेडा आहेस का?” नाना पाटेकरांना चित्रपटात न घेण्याचा विवेक अग्निहोत्रींना मिळालेला सल्ला; नाना म्हणाले, “माझ्या गावात…” वीर पहारिया अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटामध्ये त्याचा दमदार लूक आणि अॅक्शन मोडही पाहायला मिळणार आहे. खरं तर वीर मोठ्या पडद्यासाठी नवा चेहरा आहे, पण बॉलीवूडसाठी नाही. तो जान्हवी कपूरचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियाचा भाऊ आहे. त्याचे आजोबा सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. तो शिंदे यांच्या मुलीचा मुलगा आहे. https://www.instagram.com/p/Cx2oVTQoXZQ/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== वीर पहारियाचा भाऊ शिखर अभिनेत्री जान्हवी कपूरला डेट करत असल्याची चर्चा आहे. तर वीरचे नाव सैफ अली खानची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खानबरोबर जोडले गेले होते. दोघे अनेकदा एकत्र दिसले होते. आता साराप्रमाणेच वीरही मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची कौशल्ये दाखवणार आहेत. https://www.instagram.com/reel/Cx4eIU7NYqX/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== दरम्यान, 'स्काय फोर्स'ची कथा ही भारतावर झालेल्या सर्वात प्राणघातक हवाई हल्ल्यावर आधारित आहे. यामध्ये वीर पहारिया अक्षय कुमारच्या नेतृत्वाखाली देश वाचवण्यासाठी काम करताना दिसणार आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. गांधी जयंतीनिमित्त या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात झाला.