ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांच्या अकाली एक्झिटमुळे संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या चार दशकांपासून त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘गमन’ चित्रपटातून ते पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकले होते. पण, सुरुवातीला त्यांना सिनेविश्वात काम करण्याची इच्छा नव्हती. ‘नाटकाच्या चौकानात गेल्यावर अगदी राजा झाल्यासारखं वाटतं’ असं त्यांचं मत होतं. मात्र, दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांनी आग्रह केल्यामुळे नानांनी रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल ठेवलं.
नाना पाटेकर यांनी याबद्दल जुन्या एका मुलाखतीत सांगितलं होतं ते म्हणाले, “मी सिनेमात काम करायला तयारच नव्हतो. स्मिता नेहमी मला म्हणायची, तू सिनेमात काम केलं पाहिजेस नाना…चित्रपटात झळकलास तर तुला एकाचवेळी एवढ्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचता येईल. तू आता सिनेमात आलंच पाहिजेस अशी समजूत तिने काढली होती. पण, यादरम्यान मी तिला उलटं सांगायचो, मी म्हणायचो…अगं मी तिथे रमणार नाही…मला त्या नाटकाच्या चौकानात गेल्यावर अगदी राजा झाल्यासारखं वाटतं.”
तर, स्मितामुळेच मी सिनेमात आलो. पहिला सिनेमा ‘गमन’ सुद्धा तिच्याबरोबर केला असं नानांनी सांगितलं होतं. नाना पाटेकर यांनी १९७८ मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं, ‘गमन’ चित्रपटातून ते रुपेरी पडद्यावर झळकले होते.
“स्मितामुळे मी चित्रपट करू लागलो. सिनेमा हे माध्यम इतकं मोठं आहे की, एकाचवेळी तुम्हाला एवढ्या लोकांशी कनेक्ट होता येतं, असं ती सांगायची. त्यावेळी सत्यजित रे यांचं एक पान त्यांनी प्रकाशित केलं होतं. ज्यात त्यांनी नाना पाटेकरांबरोबर काम करायचंय असं लिहिलं होतं. हे सगळं अवॉर्ड्सपेक्षा मोठं आहे. मला तपन सिन्हांबरोबर काम करण्याचा देखील अनुभव मिळाला.” असं नाना पाटेकरांनी या मुलाखतीत म्हटलं होतं.
स्मिता पाटील यांनी नाना पाटेकरांना दिग्दर्शक रवी चोप्रा यांच्याकडे नेलं होतं. ‘गमन’नंतर त्यांनी ‘आज की आवाज’ मध्ये काम केलं. या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली आणि नाना पाटेकरांचा बॉलीवूडमधला प्रवास सुरू झाला होता.
