scorecardresearch

स्मृती इराणींच्या मुलीचं नाव शाहरुख खानने ठेवलं? खुलासा करत म्हणाल्या…

स्मृती इराणी व शाहरुख खानचे कौटुंबिक संबंध आहेत.

smriti irani shah rukh khan
स्मृती इराणी व शाहरुख खानचे कौटुंबिक संबंध आहेत. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. शाहरुखने या चित्रपटातून तब्बल चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं आहे. शाहरुखच्या ‘पठाण’बाबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी नुकतंच भाष्य केलं आहे. याबरोबर स्मृती इराणी यांनी शाहरुख खानशी असलेल्या कौटुंबिक नात्याबाबतही खुलासा केला आहे.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी नुकतीच ‘आजतक’ला मुलाखत दिली. ‘बजेट आजतक’ कार्यक्रमात हजेरी लावलेल्या स्मृती इराणी यांनी शाहरुखच्या पठाण व बॉयकॉट गँगबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या “कलाकार किंवा कोणत्या व्यक्तीवर असं वैयक्तिक कमेंट करणं चुकीचं आहे. आजही कलाकारांचा सन्मान केला जातो. तुम्हाला एखादी गोष्ट रुचत नसेल, तर त्याचा योग्य पद्धतीने विरोध केला पाहिजे”.

हेही वाचा>> Sidharth-Kiara Wedding: सिद्धार्थ-कियारा अडकणार विवाहबंधनात, अभिनेत्रीचा लेहेंग्यातील फोटो व्हायरल

पुढे त्या म्हणाल्या, “आज प्रेक्षकांकडे ओटीटीसारखा पर्याय आहे. त्यामुळे ते ओटीटीवर चित्रपट पाहू शकतात. त्यांना कटेंट चांगला वाटला तर चित्रपटगृहांत जाऊन ते चित्रपट पाहतात. कोणत्याही चित्रपटाचं यश हे केवळ बॉयकॉट गँगवर अवलंबून नाही”. स्मृती इराणी व शाहरुख खानच्या कुटुंबियांचे जवळचे संबंध आहेत. स्मृती इराणी यांचे पती व शाहरुख ३० वर्षांपासून मित्र आहेत. स्मृती इराणी यांनीच याचा खुलासा केला. शिवाय माझ्या मोठ्या मुलीचं नावही शाहरुख खाननेच ठेवलं असल्याचं त्या म्हणाल्या. स्मृती इराणी यांना दोन मुलं असून त्यांच्या मुलीचं नाव ‘झोइश’ असं आहे.

हेही पाहा>> Photos: भारतात पहिल्यांदाच ट्रान्स मॅन देणार बाळाला जन्म, तृतीयपंथियांनी केलेलं मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत

राजकारणात सक्रिय होण्याआधी स्मृती इराणी या एक अभिनेत्री होत्या. छोट्या पडद्यावरील “कभी सास भी कभी बहू थी” या मालिकेत त्यांनी तुलसीची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 11:23 IST
ताज्या बातम्या