scorecardresearch

आता शाहरुख- दीपिकच्या ‘पठाण’लाही बसणार बहिष्काराचा फटका? ‘या’ कारणामुळे प्रेक्षक संतप्त

२०२३ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आता शाहरुख- दीपिकच्या ‘पठाण’लाही बसणार बहिष्काराचा फटका? ‘या’ कारणामुळे प्रेक्षक संतप्त
शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाला आता प्रेक्षक बॉयकॉटची मागणी करत आहेत.

२०२२ हे वर्ष बॉलिवूडसाठी अत्यंत वाईट ठरलं आहे. यावर्षी प्रेक्षकांनी अनेक बड्या स्टारचे चित्रपट बॉयकॉट करून चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली. त्यामुळे अनेक चित्रपट चांगली कमाई करू शकले नाहीत. पण बॉयकॉट्स हे सत्र अजूनही सुरूच आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाला आता प्रेक्षक बॉयकॉटची मागणी करत आहेत.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला ‘पठाण’ या चित्रपटाचं पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. या गाण्याची सोशल मीडियावर चांगली चर्चा होती. हे गाणं प्रदर्शित झाल्यावर अनेकांना ते आवडलं, अनेकांनी त्याचं कौतुक केलं. पण तसं जरी असलं तरी काहींनी या गाण्यावर टीका केली आहे. आता या गाण्यामुळे ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी अनेक प्रेक्षक करत आहेत.

आणखी वाचा : प्रसाद जवादेला अभिनय नाही तर ‘या’ क्षेत्रात करायचं होतं करिअर, स्वतःच्या मृत्यूचा उल्लेख करत म्हणाला…

या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे दीपिका आणि शाहरुखवर चित्रित करण्यात आलेलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. पण हे गाणं पाहिल्यानंतर या चित्रपटाला विरोध होऊ लागला आहे. या गाण्यात दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांनी एक बोल्ड डान्स केला आहे. पण या गाण्यावर केलेले हे चित्रण नेटकऱ्यांना आवडलेलं नाही आणि सोशल मीडियावर त्यांनी #boycottpathaan हा हॅशटॅग सुरू केला आहे.

हेही वाचा : दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने उघड केलं ‘पठाण’ चित्रपटातील शाहरुख खानच्या लूकमागचं गुपित; म्हणाला…

अनेकांनी या गाण्यातून अश्लिलतेचं प्रदर्शन केलं जात असल्याचा आरोप या गाण्याच्या चित्रणावर केला आहे. त्यामुळे आता इतर चित्रपटांप्रमाणेच पठाण या चित्रपटालाही बहिष्कारचा फटका बसणार का हे लवकरच कळेल. ‘पठाण’ चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. २०२३ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-12-2022 at 10:10 IST

संबंधित बातम्या