सैफ अली खानचे वडिलोपार्जित पतौडी पॅलेस खूपच सुंदर आहे. या पॅलेसमध्ये जवळपास १५० खोल्या आहेत. हा पॅलेस जगातील काही सुंदर पॅलेसपैकी एक आहे. या पॅलेसची किंमत (Pataudi Palace Price) ८०० कोटी रुपये आहे. सैफ अली खानची बहीण व अभिनेत्री सोहा अली खानने या पॅलेसबद्दलच्या रंजक गोष्टी सांगितल्या आहेत. सैफचा जन्म झाला तेव्हा रॉयल ही पदवी रद्द करण्यात आली नव्हती, त्यामुळे तो खरंच राजकुमार आहे. तसेच पतौडी पॅलेसची मालकी त्याच्याकडे आहे, असं सोहाने सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सायरस ब्रोचाशी बोलताना सोहाने सांगितलं की तिची आई ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर या पतौडी पॅलेसच्या खर्चांवर लक्ष ठेवतात. “माझी आई या पॅलेसमधील सगळ्या खर्चांचा हिशेब ठेवते. रोज पॅलेसमध्ये किती खर्च येतो, महिन्याचा खर्च किती या सगळ्या गोष्टी तिला माहीत असतात. आम्ही पतौडी पॅलेस पेंट करत नाही, तर चुना लावतो. कारण पेंटच्या तुलनेत चुना परवडणारा आहे. तसेच आम्ही बऱ्याच काळापासून पॅलेससाठी काहीही नवीन वस्तू खरेदी केलेल्या नाहीत,” असं सोहा म्हणाली.

“मला पहाटे नारळाच्या झाडावर चढायला लावलं, घरी जेवायला बोलावलं अन् सोडून निघून गेला…”; विवेक ओबेरॉयचा अभिनेत्याबाबत खुलासा

सोहाच्या आजोबांनी बांधला होता पतौडी पॅलेस

या पॅलेसच्या इतिहासाविषयी बोलताना सोहा म्हणाली, “१९७० मध्ये रॉयल पदव्या रद्द झाल्यानंतर माझा जन्म झाला. माझा भाऊ सैफ राजकुमार म्हणून जन्मला, कारण त्याचा जन्म १९७० मध्ये झाला होता, त्यावेळी या पदव्या रद्द झाल्या नव्हत्या. खरं तर या पदव्यांबरोबर खूप मोठी जबाबदारी आणि बिलं येतात. माझी आजी भोपाळची बेगम होती आणि माझे आजोबा पतौडीचे नवाब होते. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते, पण आजोबा तिच्याशी लग्न करू शकत नव्हते. लग्न करायचं असल्याने आजीच्या वडिलांना प्रभावित करण्यासाठी आजोबांनी हा पतौडी पॅलेस बांधला होता.”

“गर्दीतील एकाने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श…”, ईशा देओलबरोबर पुण्यात घडलेला धक्कादायक प्रसंग; म्हणाली, “मी त्याला…”

सोहा म्हणाली की हा पॅलेस बांधताना तिच्या आजोबांचे पैसे संपले होते. त्यामुळे तुम्ही जर कधी पतौडी पॅलेसमध्ये गेलात तर तुम्हाला दिसेल की तिथे खूप सारे गालिचे आहेत. संगमरवर आणायला पैसे नव्हते, त्यामुळे त्यांनी सिमेंटचं बांधकाम तसंच ठेवलं आणि त्यावर गालिचे टाकले.

पतौडी पॅलेस (फोटो – करीना कपूर खान इन्स्टाग्राम)

सोहा म्हणाली की या पॅलेसमधील ‘जनरेटर रूम’ तिच्या मालकीची असल्याने तिला त्याची देखभाल करावी लागते. ‘जनरेटर रूम’ टू बीएचके आहे. “हा पॅलेस नीमराना हॉटेल्सला भाड्याने देण्यात आला होता, आणि त्यावेळी माझ्या आई-वडिलांना राहण्यासाठी जागा हवी होती, त्यामुळे जनरेटर रुममध्ये दुरुस्ती करून टू बीएचके करण्यात आला होता,” असं सोहाने सांगितलं.

“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”

दरम्यान, भाडेतत्त्वावर दिल्यानंतर हा पॅलेस परत विकत घ्यावा लागला होता, असं सैफने एकदा सांगितलं होतं. सैफचे कुटुंब आता हा पॅलेस सुट्टीसाठी वापरते. तसेच तो हे घर चित्रपटांच्या शूटिंगसाठी भाड्याने देतो. ‘ॲनिमल’ चित्रपटात जे रणबीर कपूरचं घर दाखवलं आहे, तो पतौडी पॅलेस आहे. या व्यतिरिक्त सैफ अली खानच्या तांडव सीरिजचे शूटिंगही या घरात झाले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soha ali khan says saif ali khan saves money by whitewashing pataudi palace owner details hrc
Show comments