Somy Ali on Govinda and Karisma Kapoor Relationship: गोविंदा काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याच्या आगामी रूपा या सिनेमातील अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारबरोबर तो नात्यात असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता या सगळ्यात करिश्मा कपूर व गोविंदा रिलेशनशिपमध्ये होते का, याबद्दल सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने वक्तव्य केले आहे.

“गोविंदा व करिश्मा यांच्या…”

गोविंदा व करिश्मा कपूर यांनी अनेक सिनेमांत एकत्र काम केले आहे. त्यांच्या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. करिश्माने गोविंदा व सलमान या दोन अभिनेत्यांबरोबर मोठ्या प्रमाणात स्क्रीन शेअर केली आहे. करिश्मा या दोन्ही कलाकारांबरोबर रिलेशनशिपमध्ये होती, अशा अफवा पसरल्या होत्या.

सोमी अलीने नुकतीच आयएनएसला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत ती करिश्मा व गोविंदा यांच्याबद्दल म्हणाली, “मी कधी गोविंदा व करिश्मा यांच्या अफेअरच्या अफवा ऐकल्या नाहीत. तसेच सलमान व करिश्माही चांगले मित्र होते. मात्र, ते रिलेशनशिपमध्ये होते, असे मी कधीही ऐकले नाही.

“सलमान करिश्माच्या खूप…”

पुढे ती म्हणाली, “सलमान करिश्माच्या खूप जवळ आहे. त्यांच्यात खूप चांगली मैत्री आहे; पण त्यांचे कधीच अफेअर नव्हते. मला हे माहीत आहे. कारण- मी इंडस्ट्रीमध्ये होते. जेव्हा तुम्ही त्या जगाचा भाग असता, त्यावेळी तुम्हाला गोष्टी कळतात. पण, मी अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही. जर कोणाला कोणाबरोबर रिलेशनशिपमध्ये यायचं असेल, तर तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी त्यांना जज करू शकत नाही”, असे म्हणत करिश्मा ही गोविंदा व सलमानबरोबर रिलेशनमध्ये नव्हती, असे सोमी अलीने स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, सोमी अली आणि सलमान खान जवळजवळ आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.