अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा २३ जून रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. सोनाक्षी व तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बाल दोघेही मुंबईत लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तसेच या दोघांना लग्नाबद्दल इंडस्ट्रीतील अनेक जण शुभेच्छा देत आहेत. अशातच सोनाक्षीचे मामा व बॉलीवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांनी भाचीच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत पहलाज निहलानी यांनी सोनाक्षी आणि झहीरचं लग्न होणार आहे, यावर शिक्कामोर्तब केलं आहे. इतकंच नाही तर ते या दोघांच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत. त्यांनी सोनाक्षी व झहीर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “मी सोनाक्षीचा मामा आहे. तिला आणि झहीरला माझे आशीर्वाद आहेत. अखेर ते लग्न करत आहेत. मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. मी याबद्दल शत्रुघ्न सिन्हांशी बोललो आहे आणि ते म्हटले की आपण भेटून बोलुयात. आमची लग्नाबाबत फार चर्चा होऊ शकली नाही,” असं पहलाज निहलानी म्हणाले.

सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाची पत्रिका पाहिलीत का? जोडप्याने खास मेसेज केलाय शेअर

सोनाक्षी व झहीर हे लग्न करणार आहेत, त्याची कल्पना होती का? असं विचारल्यावर पहलाज निहलानी म्हणाले, “आजकालची मुलं स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, त्यामुळे पालकांनी मुलांच्या निर्णयात आनंदी असायला पाहिजे. महत्त्वाची बाब म्हणजे त्या जोडप्याला वैवाहिक जीवन जगावं लागतं. त्यामुळे त्यांनी एकमेकांवर प्रेम करायला पाहिजे आणि ते एकमेकांबरोबर कंफर्टेबल असायला हवे.”

लोकप्रिय अभिनेत्रीने अवघ्या २४ व्या वर्षी घेतलं मुंबईत घर, काही दिवसांपूर्वीच घेतली मर्सिडीज, पूजेचे फोटो केले शेअर

सोनाक्षीच्या लग्नाबाबत तिच्या वडिलांची प्रतिक्रिया

“सोनाक्षी माझी एकुलती एक मुलगी आहे अन् ती माझ्या खूप जवळ आहे. जर माझ्या मुलीचे लग्न होत असेल तर मी तिच्या निर्णयाला पाठिंबा देईल. सोनाक्षीला तिचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे आणि मी तिच्या लग्नाच्या दिवशी सर्वात आनंदी बाबा असेन,” असं शत्रुघ्न सिन्हा टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

बॉयफ्रेंडपेक्षा वयाने मोठी आहे सोनाक्षी सिन्हा, अभिनेत्री ३७ वर्षांची तर झहीर इक्बालचं वय…

पूनम ढिल्लों यांनी लग्नाच्या बातमीवर केलं शिक्कामोर्तब

“मी सोनाक्षीला खूप साऱ्या शुभेच्छा देते. तिने खूप सुंदर इनव्हाइट पाठवलं आहे. ती फार लहान होती, तेव्हापासून मी तिला पाहिलं आहे आणि तिचा संपूर्ण प्रवास पाहिला आहे. देवाच्या कृपेने ती खूप राहो. ती खूप प्रेमळ मुलगी आहे. तिला आयुष्यात खूप आनंद मिळो याच शुभेच्छा. झहीर तिला नेहमी आनंदी ठेव आणि ती खूप प्रेमळ मुलगी आहे हे लक्षात ठेव,” असं पूनम ढिल्लों ‘इन्स्टंट बॉलीवूड’शी बोलताना म्हणाल्या.