सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोनाक्षीने नोंदणी पद्धतीने लग्न केल्यावर काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले, त्यासोबत तिने एक सुंदर कॅप्शन लिहिलं होतं. सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या जोडप्याने लग्न केलं आहे.

सोनाक्षीने पती झहीर इक्बालबरोबर इन्स्टाग्रामवर कोलॅब करत फोटो पोस्ट केले आहेत. “सात वर्षांपूर्वी (२३.०६.२०१७) आम्ही एकमेकांच्या डोळ्यात प्रेम पाहिलं आणि ते टिकवण्याचा निर्णय घेतला. त्याच प्रेमानं आज आम्हाला सर्व आव्हानांमध्ये व यशामध्ये मार्गदर्शन करत या क्षणापर्यंत आणलं आहे. आमच्या दोन्ही कुटुंबांच्या आणि आमच्या दोन्ही देवांच्या आशीर्वादानं आम्ही पती-पत्नी झालो आहोत,” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं. पण तिने या पोस्टचं कमेंट सेक्शन बंद केल्याचं पाहायला मिळालं.

Bollywood actress Sonakshi Sinha get emotional after zaheer Iqbal sister welcome her with garland
Video: लग्नात झहीर इक्बालच्या बहिणीनं काढली नजर, सोनाक्षी सिन्हा झाली भावुक, पाहा व्हिडीओ
Nana Patekar reacts on tanushree dutta metoo allegations
तनुश्री दत्ताने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांबद्दल नाना पाटेकरांची मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले, “मला या गोष्टीचा…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Amala Paul blessed with baby boy
Video: दुसऱ्या लग्नानंतर सात महिन्यांनी आई झाली अभिनेत्री, बाळाचं नावही ठेवलंय खूपच खास, पतीने शेअर केला व्हिडीओ
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Salman khan bodyguard shera attended dear friend Sonakshi Sinha-Zaheer Iqbal reception party
Video: सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या मुलाला पाहिलंत का? सोनाक्षी सिन्हाच्या रिसेप्शनमध्ये दिसला हटके लूकमध्ये
sonakshi sinha gets emotional as kajol hugs her
Video : सोनाक्षी सिन्हाला नववधूच्या रुपात पाहताच काजोलची होती ‘अशी’ प्रतिक्रिया, रिसेप्शन पार्टीत दोघीही झाल्या भावुक
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल

लग्नानंतर झहीर इक्बालने घेतले सासू-सासऱ्यांचे आशीर्वाद, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ते एकमेकांच्या संस्कृतीचा…”

सोनाक्षी व झहीर यांच्या लग्नाची तारीख ठरल्यापासून सोशल मीडियावर ट्रोलिंग होत आहे. सोनाक्षी व झहीर यांचं आंतरधर्मीय लग्न आहे, त्यामुळे सोनाक्षीला खूप ट्रोल केलं जात आहे. याच ट्रोलिंगमुळे तिने लग्नाच्या पोस्टच्या कमेंट्स ऑफ केल्या आहेत. झहीर व सोनाक्षीची ही पोस्ट १९ लाख लोकांनी लाइक केली आहे, पण त्यावर कमेंट्स नाहीत.

Videos: सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या रिसेप्शनला सेलिब्रिटींची मांदियाळी! रेखा, सायरा बानू, सलमान खानसह पोहोचले ‘हे’ स्टार्स

सोनाक्षी व झहीर यांनी घरी नोंदणी पद्धतीने लग्न केलं व त्यांच्या लग्नाचं जंगी रिसेप्शन मुंबईतील बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये पार पडलं. त्यांच्या रिसेप्शनला बॉलीवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळाली. सोनाक्षी व झहीरचे कुटुंबीय, तसेच नातेवाईकांशिवाय त्यांचे मित्र-मैत्रिणीदेखील या आनंदाच्या सोहळ्यात सहभागी झाले होते.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांची संपत्ती किती? दोघांपैकी श्रीमंत कोण? जाणून घ्या

रेखा, सायरा बानो, तब्बू, काजोल, सलमान खान, अदिती राव हैदरी व तिचा होणारा पती सिद्धार्थ, आकांक्षा रंजन, विद्या बालन व तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूर, अनिल कपूर, चंकी पांडे, आदित्य रॉय कपूर, संजीदा शेख, रॅपर हनी सिंग यांच्यासह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी या रिसेप्शनला हजेरी लावली.

Video: लग्नात झहीर इक्बालच्या बहिणीनं काढली नजर, सोनाक्षी सिन्हा झाली भावुक, पाहा व्हिडीओ

सोनाक्षी व झहीर दोघेही सात वर्षे डेट केल्यावर लग्नबंधनात अडकले. सोनाक्षी झहीरपेक्षा दीड वर्षांनी मोठी आहे. २३ जून २०१७ रोजी ते भेटले आणि तीच तारीख खास असल्याने त्यांनी लग्नासाठीही तीच तारीख निवडली, असं सोनाक्षीच्या पोस्टच्या कॅप्शनमधून दिसून येत आहे. अनेक सेलिब्रिटी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून सोनाक्षी व झहीरला सहजीवनासाठी शुभेच्छा देत आहेत.