बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या खासगी आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. सोनाक्षी अभिनेता झहीर इक्बालशी २३ जून रोजी लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. सोनाक्षी किंवा झहीरने अद्याप लग्नाबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही, पण या लग्नाबद्दल सोनाक्षीचे वडील व दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, तसेच तिचा भाऊ लव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशातच सोनाक्षी व झहीरच्या लग्नाबद्दल नवीन अपडेट आली आहे.

याआधी सोनाक्षीच्या लग्नाबद्दल बातम्या आल्या होत्या की तिचे खूपच खासही सोहळ्यात होईल. दोघांचे लग्न मुंबईत होणार असून केवळ जवळचे नातेवाईक आणि कुटुंबीयच यात सहभागी होतील. आता सोनाक्षीच्या एका जवळच्या मैत्रिणीने सांगितलं की सोनाक्षी आधी हिंदू रितीरिवाजांप्रमाणे लग्न करणार नाही किंवा ती निकाहही करणार नाही. ती आधी झहीरसोबत नोंदणी पद्धतीने लग्न करणार आहे. यानंतर २३ जून रोजी रिसेप्शन पार्टी होईल. या पार्टीत सोनाक्षीचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी सहभागी होणार आहेत.

सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आजकालची मुलं आई-वडिलांची…”

‘झूम’ला सोनाक्षीच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार, २३ जूनच्या संध्याकाळी सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांचं लग्न सेलिब्रेट करण्यासाठी पाहुण्यांना पार्टीत आमंत्रित करण्यात आलं आहे. पण त्यात लग्नाचा उल्लेख नाही. त्यामुळे एकतर त्यांनी लग्नाची नोंदणी आधीच केली आहे किंवा ते २३ जूनच्या सकाळी करतील. परंतु पारंपरिक रितीरिवाजांनुसार कोणतेही लग्न होणार नाही, फक्त एक पार्टी आयोजित केली जाईल.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांची संपत्ती किती? दोघांपैकी श्रीमंत कोण? जाणून घ्या

सोनाक्षीच्या कुटुंबातील जवळच्या सूत्रांनी वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या लग्नाची बातमी खरी आहे. या लग्नाला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. याशिवाय सलमान खान, हीरामंडीची संपूर्ण टीम, आयुष शर्मा, हुमा कुरेशी आणि वरुण शर्मा हे कलाकार लग्नाला उपस्थित राहू शकतात.

हेही वाचा – झहीर इक्बालशी लग्नाच्या चर्चा, सोनाक्षी सिन्हा म्हणाली, “मला माझ्या आई-वडिलांपेक्षा…”

सोनाक्षीच्या लग्नाबद्दल तिच्या वडिलांची प्रतिक्रिया

“तिने मला याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. मी जेवढं माध्यमांमध्ये आलंय तेवढंच वाचलं आहे. जर आणि जेव्हा ती मला आणि माझ्या पत्नीला याबद्दल विश्वासात घेऊन सांगेल, तेव्हा आम्ही जोडप्याला आशीर्वाद देऊ. ती नेहमी आनंदी राहो, याच शुभेच्छा. आम्हाला आमच्या मुलीच्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. ती कधीही चुकीचा निर्णय घेणार नाही. एक सज्ञान म्हणून तिला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. जेव्हा केव्हा माझ्या मुलीचे लग्न होईल तेव्हा मला वरातीसमोर नाचायला आवडेल,” असं शत्रुघ्न सिन्हा ‘टाईम्स नाऊ’शी बोलताना म्हणाले.