Sonali Bendre Cancer son Ranveer Behl reaction: आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे. ९० च्या दशकात तिच्या मोहक अदांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आणि अल्पावधीतच ती घराघरांत पोहोचली. मात्र, २०१८ मध्ये तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग घडला. सोनाली बेंद्रेने सोशल मीडियावर तिला ‘हाय-ग्रेड मेटास्टॅटिक कॅन्सर’चे निदान झाले असल्याचे सांगितले होते. ते कळल्यानंतर तिच्या कुटुंबीयांची आणि खासकरून मुलाची कशी प्रतिक्रिया होती, याबद्दलची माहिती सोनालीने दिली आहे.

‘अमुक-तमुक’ला दिलेल्या मुलाखतीत सोनाली बेंद्रेने तिचा सिनेविश्वातील प्रवास आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर तिच्या आयुष्यात झालेले बदल सांगितले. यावेळी सोनाली बेंद्रे म्हणाली, “जेव्हा मला कर्करोगाचे निदान झाले, तेव्हा माझ्या नवऱ्याने माझ्या मुलाला आईला हे असे असे झाले आहे, हे सांगितले. तेव्हा माझ्या मुलाची पहिली प्रतिक्रिया होती की, ‘पापा, ही आपल्या कुटुंबासाठी खूप अवघड परिस्थिती असणार आहे आणि याचा आपल्या पूर्ण कुटुंबावर परिणाम होणार आहे.’ “

माझे आयुष्य पूर्णपणे बदलणार – रणवीर बहल

पुढे सोनाली बेंद्रे म्हणाली, “माझ्या मुलाची प्रतिक्रिया ऐकून आम्हाला आश्चर्य वाटले आणि त्याला हे सगळे कुठून माहीत झाले आहे, असे वाटले. तेव्हा मुलाने सांगितले, ‘मी आईबरोबर एक पुस्तक वाचले होते, त्यामध्ये एका भावंडाला असेच निदान झाल्यानंतर, त्यांचे सगळे जग बदलते, याबद्दल सांगितले होते. त्यामुळे आता पापा आणि माझे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. कारण- हा आजार तसाच आहे. ‘ “

Sonali Bendre cancer journey support of husband Goldie Behl and reaction son Ranveer Behl
सोनाली बेंद्रे व तिचा मुलगा रणवीर बहल
Sonali Bendre cancer journey support of husband Goldie Behl and reaction son Ranveer Behl
सोनाली बेंद्रे

सोनाली बेंद्रे पुढे म्हणाली, “त्याचे हे बोलणे ऐकून गोल्डीला (सोनालीचा पती) वाटले, एवढ्या लहान मुलाला हे सगळे कसे माहीत आहे? पण मुलाने ते पुस्तक वाचल्यामुळे त्याला याबद्दल माहीत होते. त्या पुस्तकात त्याच्या वयाचा एक मुलगा आहे आणि त्याच्या धाकट्या भावाला कर्करोग होतो आणि त्याचे पूर्ण जग कसे बदलते, हे त्याने वाचले होते. ते वाचल्यामुळे एवढा अवघड आणि गंभीर विषय त्याच्या लक्षात आला होता. आम्ही त्याच्याशी कधी यावर बोललो नव्हतो; पण पुस्तकामुळे त्याला गांभीर्य लक्षात आले.”

Sonali Bendre cancer journey support of husband Goldie Behl and reaction son Ranveer Behl
सोनाली बेंद्रे

पुढे सोनाली बेंद्रे पुस्तकाचे महत्त्व सांगत म्हणाली, “गोष्टीची पुस्तकं म्हणून महत्त्वाची असतात. पुस्तक किंवा गोष्टी ही अशा प्रकारे उपयोगी पडतात. पुस्तकापेक्षा त्यातील गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.”