Sonam Kapoor Second Baby: बॉलीवूडची ‘मसकली’ अर्थात अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला आहे. सोनम कपूरने दुसऱ्या मुलाला जन्म दिला असून कपूर आणि आहुजा कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. अनिल कपूर यांची लेक सोनमने ४० व्या वर्षी या दुसऱ्या गोड बातमीने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत सोनमने गुड न्यूज दिली.
सोनम कपूर दुसऱ्यांदा आई झाली आहे. सोनम कपूरने ४० व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. तिने स्वतः इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करून बाळाच्या जन्माची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. सोनम कपूर व तिचा पती आनंद आहुजा लग्नानंतर आठ वर्षांनी दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. सोनमला दुसरा मुलगा झाला आहे.
सोनमने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलं, “अत्यंत कृतज्ञतेने आणि प्रेमाने भरलेल्या अंतःकरणाने आमच्या मुलाच्या जन्माची माहिती देताना खूप आनंद होत आहे. आम्हाला आज २९ मार्च २०२६ रोजी मुलगा झाला.”
“आमचं कुटुंब आता मोठं झालं आहे आणि बाळाच्या येण्याने आमच्या मनातील प्रेम आणखी वाढले आहे. वायूला आपल्या धाकट्या भावाचं स्वागत करून खूप आनंद झाला आहे. या नवीन आयुष्यामुळे आमच्या घरात जो आनंद आणि चैतन्य आले आहे, त्यासाठी आम्ही स्वतःला खूप नशीबवान समजतो.
‘चार जणांचे कुटुंब’ म्हणून या सुंदर नवीन अध्यायाची सुरुवात करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.
सोनम, आनंद आणि वायू”.
सोनम कपूर व आनंद आहुजाचे लग्न
सोनम कपूरने २०१८ मध्ये उद्योगपती आनंद आहुजाशी लग्न केलंय. लग्नापूर्वी काही काळ सोनम व आनंद यांनी काही काळ एकमेकांना डेट केलं होतं. त्यांच्या लग्नाला ८ वर्षे झाली आहेत. लग्नानंतर चार वर्षांनी २०२२ मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं. त्यांच्या मुलाचं नाव वायू आहुजा आहे. वायू साडेतीन वर्षांचा आहे.
आता सोनम दुसऱ्यांदा आई झाली आहे. वायू मोठा भाऊ झाला आहे. सोनम कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास मोठ्या मुलाच्या जन्माआधीपासून ती मोठ्या पडद्यापासून दूर आहे. सोनम मुलांच्या संगोपनात रमली आहे. आता दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर सोनम व आनंदचं चौकोनी कुटुंब पूर्ण झालं आहे.
