scorecardresearch

सोनम कपूर परतली कामावर, लेकाच्या आठवणीत शेअर केला व्हिडीओ, म्हणाली…

विमानतळावर जाताना तिने व्हिडीओ शेअर केला आहे

सोनम कपूर परतली कामावर, लेकाच्या आठवणीत शेअर केला व्हिडीओ, म्हणाली…
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर काही महिन्यांपूर्वीच आई झाली. २० ऑगस्ट २०२२ रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. सोशल मीडीयावर पोस्ट शेअर करत सोनमने ही गोड बातमी चाहत्यांनी दिली होती. सोनमच्या बाळाचं बारसंही मोठ्या थाटामाटात पार पडत त्याचं ‘वायू’ असं नाव ठेवण्यात आलं होतं.आता सोनम कपूरने पुन्हा एकदा आपल्या कामावर लक्ष देणार आहे. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती भावुक दिसत आहे.

सोनम आई झाल्यापासून आपल्या मुलाची ती विशेष काळजी घेत आहे. सोनम कपूर व्हिडिओमध्ये म्हणते, ‘मी तिला खूप मिस करणार आहे. एक दिवसासाठी का होईना पण त्याला असं सोडून जायला मी घाबरत आहे. तो माझ्या आई आणि बहिणीबरोबरआहे त्यामुळे मला काही टेन्शन नाही. मी खरोखर फक्त २० तासांसाठी जात आहे.

‘RRR’, ‘KGF2’वर भारी पडणार ‘हा’ पाकिस्तानी चित्रपट; रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ला देणार टक्कर?

वायूच्या जन्मानंतर सोनम कपूरची ही पहिली आंतरराष्ट्रीय प्रवास करत आहे. मुलाला एकटं टाकून जाताना तिच्या मनात थोडी धाकधूक होतीच. विमानतळावर जाताना तिने व्हिडीओ शेअर केला आहे. ती रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होताना दिसली आहे.

सोनम कपूर व आनंद अहुजाने २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकत नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. त्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये वायूचे आगमन झाले. प्रेग्नंन्सी दरम्यान केलेल्या फोटोशूटमुळेही सोनम बऱ्याचदा चर्चेत होती. ‘वीरे दी वेडिंग’, ‘नीरजा’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘खूबसूरत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. आता ती सुजॉय घोषच्या ‘ब्लाइंड’ या चित्रपटात दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 13:41 IST

संबंधित बातम्या