Premium

Odisha Train Accident : “आपण शोक व्यक्त करतो आणि…” सोनू सूदचा व्हिडीओ चर्चेत, सरकारला उद्देशून म्हणाला…

सोनू या अशा घटनांबाबत कायमच स्पष्टपणे त्याची बाजू मांडतो

sonu-sood-odisha-accident
फोटो : सोशल मिडिया

ओडिशातील रेल्वे अपघातानंतर देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनजवळ तीन रेल्वेत झालेल्या विचित्र अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर, ९०० हून अधिक जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर ओडिशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.रेल्वेच्या झालेल्या अपघातामुळे अनेकांना जोरदार धक्का बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दुर्घटनेबद्दल समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. फिल्म सेलिब्रिटीजनीसुद्धा याबाबतीत ट्वीट करत हळहळ व्यक्त केली आहे. ज्युनिअर एनटीआर, विवेक अग्निहोत्री, अक्षय कुमार, सनी देओल, परिणीती चोप्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. अशातच आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : अनुराग कश्यपचा ‘केनडी’ पाहून दिग्दर्शक शेखर कपूर झाले भावुक; म्हणाले, “या चित्रपटाने…”

सोनू या अशा घटनांबाबत कायमच स्पष्टपणे त्याची बाजू मांडतो. कोविड काळात त्याने केलेली मदत आणि जपलेलं समाजभान आपल्याला ठाऊक आहे. नुकतंच त्याने या संदर्भात एक व्हिडीओ ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे आणि अपघातात सापडलेल्या लोकांच्या कुटुंबासाठी त्याने प्रार्थना केली आहे. सरकारने दिलेल्या नुकसान भरपाईनंतर या लोकांचे हाल काय होतील ही चिंतादेखील सोनूने या व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

तो याबद्दल म्हणाला, “आपण एक ट्वीट करतो, शोक व्यक्त करतो आणि नंतर आपल्या कामात मग्न होतो, पण जी लोक आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी घरदार सोडून दुसऱ्या शहरात जातात, त्यांचं काय? आज बरीच कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, ते पुन्हा खंबीरपणे उभे राहू शकतील का?” इतकंच नव्हे तर या व्हिडीओमधून सोनूने लोकांना आणि सरकारला एक विनंतीही केली आहे.

सोनू म्हणाला, “माझी सगळ्यांना एक विनंती आहे की हे चित्र बदलण्यासाठी सगळ्यांनीच काहीतरी करा. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आत्ताच याबाबतीत काही ठोस पावलं उचलायला हवीत ज्यामुळे भविष्यात होणाऱ्या दुर्घटना टळतील आणि आपल्याला एक धडा मिळेल.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 17:23 IST
Next Story
‘फेव्हरेट गर्ल’ म्हणत रितेश देशमुखने बायकोबरोबर शेअर केला खास व्हिडीओ, नेटकरी म्हणाले “भावा आता रडवणार…”