Sonu Sood Vows Help To Elderly farmer couple: शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो. मात्र, शेतकऱ्यांना दुष्काळ, पूर, अतिवृष्टी, गारा, वादळ अशा अनेक नैसर्गिक संकटांसह आर्थिक संकटाचा सामनादेखील करावा लागतो, यामुळे अनेक शेतकरी आत्महत्यादेखील करतात.

काही शेतकरी अशा अडचणीवर मात करण्यासाठी विविध मार्ग अवलंबताना दिसतात. सोशल मीडियावर असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका शेतकरी जोडप्याचा आहे. बैल घेण्यास पैसे नसल्याने एका शेतकऱ्याने स्वत:लाच नांगराला जुंपल्याचे दिसत आहे, तर ती महिला नांगर चालवताना दिसत आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ महाराष्ट्रातील लातूरमधील आहे.

सोनू सूद काय म्हणाला?

आता या व्हिडीओवर बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने प्रतिक्रिया दिली आहे. सोनू सूदने न्यूज २४ वरचा हा व्हिडीओ शेअर करत लिहिले “तुम्ही नंबर पाठवा, मी बैल पाठवतो.” अभिनेत्याने याआधीही अनेकांना मदत केली आहे.

सोनू सूदच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी त्याचे कौतुक केले आहे, तर काहींनी बैलापेक्षा त्यांना ट्रॅक्टरची गरज आहे, असे म्हटले आहे. एकाने म्हटले आहे की जे या कुटुंबाला ट्रॅक्टर देण्याबद्दल बोलत आहेत, त्यांच्यासाठी माझा एक प्रश्न आहे. आर्थिक तणावामुळे बैल विकावे लागले. ट्रॅक्टरसाठी डिझेल कुठून आणणार? या कुटुंबाला बैलांची गरज आहे.

याबरोबरच, न्यूज २४ च्या व्हिडीओवर अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली होती. त्यावर न्यूज २४ ने सोनू सूदच्या पोस्टवर रिप्लाय करत लिहिले की, सध्या या शेतकरी जोडप्यासाठी कृषी विभागाने एक ट्रॅक्टर आणि १.२५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

सोनू सूदने आजपर्यंत देशभरातील अनेकांना निस्वार्थपणे मदत केल्याचे पाहायला मिळाले आहे. करोनाच्या काळात अनेक कुटुंबांसमोर जेव्हा अन्नपाण्याचा प्रश्न होता, अनेक कामगार जेव्हा मुंबईत अडकले होते, तेव्हा सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला होता. अभिनेत्याने त्या काळात स्वखर्चाने लाखो कामगारांना सुखरुप त्यांच्या घरी पोहचवले होते. गरजू लोकांना मदत केल्याने सामान्यांमध्ये अभिनेत्याची मोठी लोकप्रियता आहे. त्याच्या अभिनयाबरोबरच, तो त्याच्या सामाजिक कार्यासाठीदेखील ओळखला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेता ‘फतेह’, ‘विक्रम राठोड’, ‘सिंबा’, ‘सिता’, ‘आर राजकुमार’ अशा अनेक चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याने खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.