शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तब्बल ४ वर्षांनी तो मोठया पडद्यावर झळकला आहे. ‘पठाण’ चित्रपटाची प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. चाहते चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी करत आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने दमदार कामगिरी केली होती. तर आता या चित्रपटाच्या चौथ्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची आकडेवारी समोर आली आहे. या चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता मात्र प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला आहे. यावरच अभिनेते प्रकाश राज यांनी भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिद्ध अभिनेते प्रकाशराज सोशल मीडियावर सक्रीय असतात. सामाजिक मुद्दे, विशेष करून मोदी सरकारवर ते कायमच टीका करत असतात. याआधी त्यांनी शाहरुखचे कौतुक केले होते. मात्र पुन्हा एकदा त्यांनी ट्वीट करत बॉयकॉट करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी एक फोटो शेअर केला आहे ज्यात काही संघटना विरोध करताना दिसत आहे. त्यांनी कॅप्शन दिला आहे की आम्ही प्रेमाने याचा विरोध करू बॉयकॉट करणाऱ्यांनो, सकारात्मकता वाढत आहे मला आशा आहे की आपल्या देशाची ही भावना तुम्हाला बरे करेल, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बॉयकॉट बॉलिवूड’वर दिग्दर्शक मधुर भांडारकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले “सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर…”

हा चित्रपट बुधवारी म्हणजेच २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ७० कोटींचा गल्ला जमवला होता. यानुसार पहिल्या दोन दिवसांत या चित्रपटाने १२७.५० कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत थोडी घसरण पाहायला मिळाली. पण चौथ्या दिवशी म्हणजेच काल मात्र या चित्रपटाने पुन्हा एकदा चांगली कमाई केली आहे.

‘पठाण’मध्ये शाहरुखसह दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच चित्रपटात सलमान खानची झलक पाहायला मिळणार आहे त्यामुळे प्रेक्षक आता चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South actor prakash raj dig on boycott bollywood trend and commented on pathaan protest spg
First published on: 29-01-2023 at 13:29 IST