Premium

‘जवान’नंतर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा बॉलीवूडमध्ये करणार नाही काम; दिग्दर्शक अ‍ॅटलीवर आहे नाराज

नयनतारा दिग्दर्शक अ‍ॅटलीवर कोणत्या कारणामुळे नाराज? जाणून घ्या

south actress nayanthara
नयनतारा दिग्दर्शक अ‍ॅटलीवर कोणत्या कारणामुळे नाराज? जाणून घ्या

बॉलीवूडच्या किंग खानचा ‘जवान’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शाहरुखचा ‘जवान’ चित्रपट ‘पठाण’ प्रमाणे बक्कळ कमाई करताना दिसत आहे. प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाने बरेच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. पण अशातच या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारी दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा दिग्दर्शक अ‍ॅटलीवर नाराज असल्याचं समोर आलं आहे. तसेच ती ‘जवान’नंतर कुठल्याही बॉलीवूडच्या चित्रपटात काम करणार नसल्याचं बोललं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीनं दिली आनंदाची बातमी; म्हणाली, “तुमचा विश्वास…”

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, आता नयनताराला ‘जवान’नंतर कोणत्याच बॉलीवूडच्या चित्रपटात काम करण्यात रस नाही. दिग्दर्शक अ‍ॅटली कुमारवर ती नाराज आहे. कारण ‘जवान’मधील तिची भूमिका बरीच कापून दीपिका पदुकोणची भूमिका वाढवली आहे. त्यामुळे नयनताराची भूमिका साइडलाइड झाली आहे.

हेही वाचा – Rahul Vaidya And Disha Parmar: मुलीचं नाव काय ठेवणार? राहुल वैद्य म्हणाला, “राशीनुसार…”

नयनतारा ‘जवान’चे प्रमोशन करताना जास्त दिसत नाहीये. एवढंच नाही तर मुंबईत चित्रपटाच्या यशानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देखील नयनतारा उपस्थित राहिली नव्हती. या परिषदेत शाहरुख, दीपिका, विजय सेतुपति, सान्या मल्होत्रा, रिद्धि डोगरा, अ‍ॅटली यांनी हजेरी लावली होती.

हेही वाचा – ‘कट्यार काळजात घुसली’नंतर सुबोध भावे झळकणार ‘या’ संगीतमय चित्रपटात; म्हणाला, “अखेर…”

दरम्यान, ‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ७५ कोटींची कमाई केली. त्यामुळे ‘जवान’ पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला. या चित्रपटाने आतापर्यंत ५१८ कोटींची कमाई केली आहे. तसेच १४व्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १० कोटींची कमाई केली आहे. अशाच प्रकारे ‘जवान’ला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत राहिला तर लवकरच ‘पठाण’चा रेकॉर्ड ब्रेक करेल. ‘पठाण’ चित्रपटाने एकूण ५४३ कोटींची कमाई केली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: South actress nayanthara upset with atlee was chopped scene in jawan pps

First published on: 22-09-2023 at 10:20 IST
Next Story
“माझी जीभ घसरते अन्…”, कंगना रणौतचं ‘त्या’ मुद्द्यावर वक्तव्य; म्हणाली, “मला भारतीय दिसायचं नव्हतं, कारण…”