Spider Man Brand New Day Box Office Collection: सध्या थिएटरमध्ये अनेक सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. त्यामध्ये मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमांचा समावेश आहे. काही हॉलीवूड सिनेमेदेखील प्रदर्शित झाले आहेत. काही सिनेमांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सध्या ‘मामाच्या गोव्याला जाऊया’, ‘हनुमान अंश’, ‘धमाल ४’, ‘जन नायकन’ अशा सिनेमांचा समावेश आहे. या सगळ्यात ‘स्पायडर मॅन’ हा सिनेमा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

हॉलीवूड सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

थलपती विजय यांच्या जन नायकन या सिनेमाला प्रदर्शित होऊन १४ दिवस झाले. सिनेमाने १४ दिवसांत बजेटच्या ३६.६७ टक्के रक्कम वसूल केली आहे. ‘धमाल ४’सुद्धा बजेट वसूल करण्यात अपयशी ठरला आहे. दुसरीकडे टॉम हॉलंडचा स्पायडर मॅन : ब्रँड न्यू डे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. फक्त सात दिवसांत या सिनेमाने जगभरात जवळजवळ ११ हजार (११,०००) कोटींची कमाई केली आहे; तर फक्त भारतात या सिनेमाने ३८० कोटी इतकी एकूण कमाई केली आहे.

स्पायडर मॅन सिनेमाचे बजेट २,१०० कोटी इतके आहे. मार्व्हल स्टुडिओज’ आणि ‘सोनी पिक्चर्स’ या दोहोंची संयुक्त निर्मिती असलेल्या या सिनेमाने सात दिवसांत बजेटच्या पाच पट अधिक कमाई केली आहे. भारतात या सिनेमाला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आता आगामी काळात हा सिनेमा किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जुलै महिन्यात सहा भारतीय सिनेमे प्रदर्शित झाले होते. ‘बेबी डू डाय डू’, ‘अल्फा’, ‘दुल्हनिया ले आएगी’, ‘भाई तेरा स्टार है’,’ ‘द इंडिया स्टो’री’ या सिनेमांना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकले नाहीत. ‘धमाल ४’ने प्रेक्षकांना खळखळून हसवले. मात्र, हा सिनेमाही बजेटइतके पैसे कमावू शकला नाही. त्याबरोबरच जन नायकन हा सिनेमा सुपरस्‍टार थलपती विजय यांचा शेवटचा सिनेमा आहे; मात्र तरीही या सिनेमाला प्रेक्षकांचा जबरदस्त म्हणावा असा प्रतिसाद मिळू शकलेला नाही.

दरम्यान, स्पायडर मॅन या सिनेमाबरोबरच ख्रिस्तोफर नोलन यांच्या ‘द ओडिसी’ या सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या सिनेमाने जगभरात ? १०० कोटींच्या जवळपास कमाई केली आहे.