Star of Bollywoods Golden Era Motilal Died Penniles: ६० च्या दशकात असे काही कलाकार होते, ज्यांच्या अभिनयाबद्दल आजही बोलले जाते. त्यांच्या अभिनयाची छाप अनेक कलाकारांवर पडली आहे. अभिनेते मोतीलाल हे यापैकीच एक आहेत.

मोतीलाल यांनी ६० च्या दशकात प्रमुख भूमिका साकारल्या. विविध धाटणीच्या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मोतीलाल यांच्या अभिनयाचा अमिताभ बच्चन, नसीरुद्दीन शाह यांच्यावर प्रभाव आहे. १९५५ साली प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटातील त्यांची चुन्नीलाल ही भूमिका चांगलीच गाजली होती. याच चित्रपटात दिलीप कुमार व वैजयंतीमाला हे प्रमुख भूमिकेत होते. पण, इतकी लोकप्रियता असूनही त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांना दारिद्र्याचा सामना करावा लागला होता, असे म्हटले जाते.

बॉलीवूडच्या ‘या’ सुपरस्टारकडे मृत्यूवेळी एक रुपयाही नव्हता

२०१५ ला टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक सुधीर मिश्रा म्हणालेले, “मोतीलाल यांच्या चांगल्या कामाचे सिंहावलोकन झालं पाहिजे. अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये मोतीलाल यांच्या कामाचा अभ्यास झाला पाहिजे, कारण ते सर्वकाळ महान अभिनेते आहेत.”

मोतीलाल यांचा जन्म १९१० साली शिमला येथे झाला. १९३४ साली त्यांनी ‘शहर का जादू’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. पण, १९३८ साली प्रदर्शित झालेल्या ‘जागिरदार’ या चित्रपटातून त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. ‘देवदास’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअर पुरस्कार मिळाला. १९५२ साली प्रदर्शित झालेला ‘संपत’, १९५९ साली प्रदर्शित झालेला ‘अनाडी’ आणि ‘पैगाम’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.”

‘द हंड्रेड ल्युमिनरीज ऑफ इंडियन सिनेमा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत मोतीलाल यांच्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी लिहिले होते, “एका महान अभिनेत्याच्या कामाबद्दल काहीही लिहिले गेलेले नाही. मोतीलाल त्यांच्या काळाच्या पुढे होते. ते आज जिवंत असते तर त्यांच्या प्रतिभेने त्यांनी आजही स्वत:चे स्थान निर्माण केले असते. खरं तर, ते आपल्यापैकी कोणापेक्षाही चांगले काम करत असते.” अस्पृश्यतेबद्दलच्या एका चित्रपटात मोतीलाल यांनी काम केले होते, त्याबद्दल महात्मा गांधी यांनी त्यांचे कौतुक केले होते.

मोतीलाल हे चित्रपटांबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील ओळखले जात होते. त्यांना जुगार खेळण्याची आणि विमान प्रवासाची आवड होती. असे म्हटले जाते की त्यांनी त्यांच्या ऐशोआरामासाठीच्या जीवनशैलीसाठी खूप पैसे गमावले. ते अभिनेत्री काजोलची आजी आणि तनुजाची आई शोभना समर्थ यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी १९५४ साली ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत मोतीलाल गमतीने म्हणालेले, “मी तीन हृदयविकाराचा झटके, एक विमान अपघात तसेच जवळजवळ पाण्यात बुडण्यापासून वाचलो आहे. त्याचवर्षी वयाच्या ५४ वर्षी मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समोर आलेल्या रिपोर्टनुसार जेव्हा त्यांच्या मृत्यू झाला, तेव्हा त्यांच्याकडे अजिबात पैसे नव्हते. त्यांनी काही गुंतवणूक केल्या होत्या. त्यामध्ये त्यांना अपयश आले. तसेच त्यांनी निर्मित केलेल्या एका प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवले होते, त्यामध्ये त्यांना नुकसान सहन करावे लागले. त्यांचा ‘छोटी छोटी बातें’ हा चित्रपट मरणोत्तर प्रदर्शित झाला.त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. भारत सरकारने २०१३ मध्ये मोतीलाल यांच्या स्मरणार्थ एक टपाल तिकिट जारी केले.