Stree 2 Box Office Collection day 1: श्रद्धा कपूर व राजकुमार राव यांचा बहुचर्चित चित्रपट 'स्त्री २' गुरुवारी (१५ ऑगस्ट) प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. 'स्त्री' २०१८ मध्ये रिलीज झाला होता, त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी 'स्त्री २' प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आला आहे. 'स्त्री २' चे स्टार्स चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत होते. चित्रपटाच्या टीझर, ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाला होता, आता चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे. Stree 2 grand Opening: 'स्त्री २'ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग केली आहे. २०१८ च्या सुपरहिट हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित सिक्वेल स्वातंत्र्यदिनी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), राजकुमार राव (Rajkummar Rao), अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'सॅकनिल्क'च्या वृत्तानुसार, या चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी ५४.३५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केलं होतं अरेंज मॅरेज, कोण आहेत त्यांचे पती? जाणून घ्या 'स्त्री २' ची दमदार कमाई 'स्त्री २' चे बुधवारी काही खास ओपनिंग प्रीमियर होते, त्यातून चित्रपटाने ८.३५ कोटींची कमाई केली. पहिल्या दिवशी चित्रपटाने अंदाजे ४६ कोटी कमावले. अशारितीने चित्रपटाची एकूण कमाई ५४.३५ कोटी झाली आहे. 'स्त्री २'ने 'कल्की 2898 एडी' (हिंदी- २४ कोटी) आणि 'फायटर'ला (२२ कोटी) मागे टाकलं असून तो २०२४ मध्ये पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. https://www.instagram.com/reel/C9j4GCwoZgg/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== “५ महिन्यांपूर्वी बाबा होतास, आता कोण झालास!” विकी कौशलला सॅम मानेकशॉ यांच्या मुलीने केला मेसेज; अभिनेता म्हणाला… २०२३ मधील शाहरुख खानच्या 'जवान' (६५.५ कोटी) आणि 'पठाण' (५५ कोटी) नंतर 'स्त्री २' हा आतापर्यंतचा सर्वात मोठी ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. 'स्त्री २' ला बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी अक्षय कुमार, तापसी पन्नू-स्टारर 'खेल खेल में' आणि जॉन अब्राहम-शर्वरी यांच्या 'वेदा'शी स्पर्धा करावी लागली. पण तरीही चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. 'स्त्री २' ची पहिल्या दिवसाची कमाई (फोटो - श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम) ॲडव्हान्स बुकिंगचा फायदा 'स्त्री 2' ची ॲडव्हान्स बुकिंगही खूपच चांगली झाली होती. या चित्रपटाची पहिल्या दिवशी ३,९२,००० तिकिटं विकली गेली. या चित्रपटाने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकलं. पहिल्या दिवशी चित्रपटाची ऑक्युपेन्सी ७५.०९ टक्के होती. प्रसिद्ध अभिनेत्री कामावर जाण्याआधी जुळ्या मुलांबरोबर घालवतेय वेळ, फोटो शेअर करत म्हणाली… चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झाल्यास 'स्त्री' जिथे संपला होता, तिथूनच 'स्त्री २' ची सुरुवात होती. यावेळी गावातील लोकांमध्ये 'सरकटा'मुळे दहशतीचं वातावरण आहे. या चित्रपटात अनेक कॅमियो आहेत, वरुण धवनचा 'भेडिया' चित्रपटातील भूमिकेत यामध्ये कॅमिओ आहे.