scorecardresearch

“ही मलायकाची…” शाहरुख खानची लेक सुहाना ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे झाली ट्रोल

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा ‘द आर्चीज’च्या रॅपअप पार्टीतील एक व्हिडीओ झाला आहे प्रचंड व्हायरल

“ही मलायकाची…” शाहरुख खानची लेक सुहाना ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे झाली ट्रोल
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान आगामी वर्षात बॉलिवूड पदार्पण करणार आहे. २०२३मध्ये सुहानाचा ‘द आर्चीज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात तिच्याबरोबरच खुशी कपूर, अगस्त्य नंदा हे स्टारकिड्सही बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. झोया अख्तरच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच झोयाने सोशल मीडियावर संपूर्ण टीमबरोबरचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता सुहाना खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सुहाना खान आणि खुशी कपूर ‘द आर्चीज’च्या रॅपअप पार्टीसाठी जात असतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. लाल रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत होती. मात्र त्या ड्रेसमध्ये चालताना ती थोडी अनकम्फर्टेबलही असलेली दिसत आहे. तिच्या याच चालण्याच्या स्टाइलवरून तिची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. अनेकांनी तिची तुलना मलायका अरोराशी केली आहे.

आणखी वाचा- “मला अभिनयातलं कळत नाही…” सुहाना खानच्या डायरीत शाहरुखने लेकीसाठी लिहिला खास संदेश

सुहाना खान आणि खुशी कपूरच्या व्हिडीओवर कमेंट करताना अनेक युजर्सनी त्यांना ट्रोल केलं आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिलं, “ही मलायकासारखी का चालतेय?” तर आणखी एकाने लिहिलं, “भविष्यातली मलायका” याशिवाय काहींनी खुशी कपूरची तुलना दीपिका पदुकोणशी केली आहे.

आणखी वाचा-५० श्रेष्ठ अभिनेत्यांच्या यादीत किंग खानचा समावेश; हा सन्मान मिळवणारा शाहरुख ठरला एकमेव भारतीय

दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक झोया अख्तरच्या या चित्रपटात सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा या स्टार किड्ससोबतच अभिनेत्री डॉट, मिहिर आहूजा, वेदांग रैना, युवराज मेंडा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कॉमिक बुकमधील पात्र आर्ची एंड्रयूज आणि त्याचे मित्र यावर आधारित आहे. या चित्रपटात झोया अख्तरनं कॉमिक बुकमधील पात्रांना भारतीय लुक देण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-12-2022 at 13:05 IST

संबंधित बातम्या