scorecardresearch

सुकेश चंद्रशेखरकडून जॅकलिन फर्नांडिसला ‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा, म्हणाला “तुम्ही ज्याच्यावर…”

सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला दिल्या ‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा

sukesh chandrashekhar wishes happy valentine to jacquline
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

२०० कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी सुकेश चंद्रशेखर तिहार तुरुंगात आहे. या प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून अनेक खुलासे होत आहेत. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींशी सुकेशचे प्रेमसंबंध असल्याचं उघड झालं होतं. त्याने महागडे गिफ्ट देऊन तरुणींना जाळ्यात ओढलं होतं. आता ‘व्हॅलेंटाइन डे’मुळे सुकेश पुन्हा चर्चेत आला आहे.

सुकेशने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुकेशला दिल्लीतील एका कोर्टात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी पत्रकारांनी त्याला जॅकलिन फर्नांडिसबरोबर तुझं रिलेशनशिप कसं आहे? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना सुकेशने जॅकलिन व्हॅलेंटाइन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला, “माझ्याकडून तिला व्हॅलेंटाइन दिनाच्या शुभेच्छा द्या”. त्यानंतर सुकेशला जॅकलिनने त्याच्यावर केलेल्या आरोपांबाबतही विचारण्यात आलं.

हेही वाचा>> कतरिना कैफने नशेत एक्स बॉयफ्रेंडला केलेला फोन, स्वत:च केला खुलासा, म्हणाली…

हेही वाचा>> “ऐतिहासिक क्षण…” शिव ठाकरेबरोबरचा ‘तो’ फोटो शेअर करत ‘बिग बॉस’ विजेत्या एमसी स्टॅनची पोस्ट

जॅकलिनने केलेल्या आरोपांवर उत्तर देत सुकेश म्हणाला, “मला यावर काहीही बोलायचं नाही. हे सगळं बोलण्यामागे तिच्याकडे नक्कीच काहीतरी कारण असेल. जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता, तेव्हा तुम्ही त्याचं संरक्षण करता. त्यामुळे मला याबाबत काहीच बोलायचं नाही”.

हेही वाचा>> Video: राखीला जवळ घेतलं, किस केलं अन्…; अभिनेत्रीने शेअर केला आदिलबरोबरचा बेडरुममधील ‘तो’ व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…

दरम्यान, सुकेशने जॅकलिनला ५२ लाख रुपये किंमतीचा घोडा भेट म्हणून दिला होता. तर ९ लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट दिली होती. नोरा फतेही व जॅकलिन फर्नांडिसने सुकेशविरोधात साक्ष दिली होती. परंतु, सुकेशने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 10:58 IST
ताज्या बातम्या