Sunidhi Chauhan Emotional Video From Lucknow Concert Goes Viral : गायक, गायिकांचे लाईव्ह कॉन्सर्ट पाहण्यासाठी त्यांचे चाहते मोठ्या संख्येने महागडी तिकिटं खरेदी करून गर्दी करत असतात. आपल्या आवडत्या गायकांना लाईव्ह गाताना पाहणं त्यांच्यासाठी मोठी गोष्ट असते. तसंच चाहत्यांकडून प्रत्यक्षपणे प्रतिक्रिया मिळणं ही कलाकारांसाठीही मोठी गोष्ट असते. परंतु, अनेकदा लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान अनेक किस्से घडत असतात. अशातच आता लोकप्रिय गायिका सुनिधी चौहानबरोबरही असंच काहीसं घडलं आहे.

सुनिधी चौहान सध्या तिच्या आय एम होम इंडिया टूरमध्ये व्यग्र आहे. यादरम्यान तिने ७ मार्चला लखनऊ येथे सादरीकरण केलं. परंतु, यावेळी ती चक्क भरकॉन्सर्टमध्ये रडली आणि चाहत्यांची माफीसुद्धा मागितली. तिचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लखनऊ येथील कॉन्सर्टदरम्यान नेमकं काय घडलं सुनिधी का रडत होती याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर व्हायल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सुनिधी तिच्या चाहत्यांसह संवाद साधताना दिसत आहे. यावेळी तिने काळ्या रंगाचा छान डिझायनर ड्रेस परिधान केला असून केस मोकळे सोडले आहेत. परंतु, यावेळी तिच्या डाळ्यांमधून अश्रू येताना दिसत आहेत. या व्हिडीओमधून ती तिच्या चाहत्यांना माझा घसा खूप खराब झाला आहे, आज माझा आवाजही खूप खराब आहे. पण, मला माहीत आहे की तुम्ही सगळे माझ्याबरोबर आहात आणि म्हणूनच मला सादरीकरण करायचं आहे. पूर्वी कधीच माझ्याबरोबर असं घडलेलं नाहीये आणि हे खूप संकोचित करणारं आहे, मला माफ करा, मला नेहमी १०० टक्के द्यायचे असतात.”

सुनिधी पुढे म्हणाली, “दुर्दैवाने मी प्रयत्न करत आहे, पण कदाचित तितकं चांगलं होणार नाही, मला माफ करा, मी सुरू करते. धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी.” सुनिधी यानंतर कोलकातामध्ये १४ मार्चला सादरीकरण करणार आहे आणि तिच्या या टूरमधील हे शेवटचं कॉन्सर्ट असेल. डिसेंबर २४-२५ पासून तिची ही टूर सुरू आहे. मुंबईपासून सुरुवात करून दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, चेन्नई, जयपूर, चंदीगड आणि इंदौरमध्ये तिचे आतापर्यंत कॉन्सर्ट पार पडले आहेत.

दरम्यान, सुनिधीने आतापर्यंत अनेक लाईव्ह कॉन्सर्ट केले आहेत आणि तिच्या कॉन्सर्टला नेहमीच तिचे चाहते मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. गायिकेने आतापर्यंत अनेक लोकप्रिय गाणी गात प्रेक्षकांच्या मनात तिची वेगळी जागा निर्माण केली आहे.