बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित, इंडस्ट्रीत ‘अन्ना’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सुनील शेट्टी आणि लोलो म्हणून लोकप्रिय झालेली अभिनेत्री करिश्मा कपूर या तिघांनी मिळून ‘डान्स दीवाने’च्या रंगमंचावर प्रचंड धमाल केल्याचं नुकत्याच समोर आलेल्या प्रोमो आणि व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. हे तिन्ही जण ९० च्या दशकातील आघाडीचे कलाकार म्हणून ओळखले जातात. या तिघांची अनेक वर्षांनी ‘डान्स दीवाने’ कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा एकत्र भेट झाली.

१९९६ मध्ये ‘कृष्णा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये करिश्मा कपूर आणि सुनील शेट्टी यांच्यावर चित्रित झालेलं “झांझरिया…” हे गाणं प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालं होतं. अभिजीत भट्टाचार्य यांनी हे गाणं गायलं होतं. आता २८ वर्षांनी पुन्हा एकदा याच गाण्यावर करिश्मा व सुनीलने जबरदस्त डान्स केला आहे.

Hardik Pandya Vadodara Video
Hardik Pandya : हार्दिक पंड्याचे भव्य स्वागत…खुल्या बसमधून विजयी परेड, बडोद्यातील चाहत्यांच्या गर्दीचा VIDEO व्हायरल
Donald trump and jagannath rathyatra connection
“भगवान जगन्नाथांनी वाचवले डोनाल्ड ट्रम्प यांचे प्राण”; काय आहे डोनाल्ड ट्रम्प आणि भगवान जगन्नाथ रथयात्रेचे कनेक्शन?
Sunil Gavaskar 75th Birthday Special boundary hero who allowed the Laxman Line to cross
‘लक्ष्मणरेषा’ पार करू देणारा बाउंड्रीवीर…
Nita Ambani Cries Hugging Rohit Sharma Video
नीता अंबानी रोहित शर्माला मिठी मारून रडल्या, तर सूर्याला.. राधिका- अनंतच्या संगीत सोहळ्यातील नवा Video पाहिलात का?
Sania Mirza Marrying Mohammed Shami Rumors
सानिया मिर्झा व मोहम्मद शमीच्या लग्नाच्या चर्चांवर सानियाच्या वडिलांनी सोडलं मौन; म्हणाले, “ती त्याला भेटली..”
CCTV Footage Burger King 26 Year Old Guy Shot 38 Bullets
“हा सूड होता”, म्हणत बर्गर किंगमध्ये ३८ गोळ्या झाडून तरुणाची हत्या! CCTV फुटेजमध्ये दिसली ‘मिस्ट्री गर्ल’; वाचा घटनाक्रम
vladimir puting and kim jong
पेहले तुम! कारमध्ये बसण्यावरून रशिया आणि उत्तर कोरियाच्या नेत्यांची एकमेकांना विनंती, सर्वांत आधी कोण गेलं गाडीत?
a guy returned after 2 and half year from london and enter at home as a unknown person
Video : अचानक अनोळखी व्यक्ती घरात शिरली अन् घरच्यांनी ओळखलेच नाही, मायदेशी परतलेल्या मुलाने दिले भन्नाट सरप्राइज

हेही वाचा : तावडे सिस्टर्स! तितीक्षाच्या लग्नाला २ महिने पूर्ण झाल्यावर खुशबूने शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, “मी तुझ्या…”

“झांझरिया…” गाण्याला आता २८ वर्षे पूर्ण झाली आहेत. ९० च्या दशकात हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं. ‘डान्स दीवाने’च्या मंचावर करिश्मा आणि सुनीलला एकत्र डान्स करत असल्याचं पाहून माधुरी दीक्षितला देखील शिट्ट्या वाजवण्याचा मोह आवरता आला नाही. तिने दोघांंचं भरभरून कौतुक करत शिट्ट्या वाजवल्या. दोन्ही सहकलाकारांना एकत्र थिरकताना पाहून तिने मोठ्या आनंदाने प्रोत्साहन दिलं.

हेही वाचा : “चित्रपट बेभरवशाचा धंदा पण, मालिकांमध्ये…”, लेखिका मधुगंधा कुलकर्णीने सांगितला दोन्ही माध्यमातील फरक, म्हणाली…

‘डान्स दीवाने’मध्ये प्रेक्षकांना सुनील-करिश्माच्या “झांझरिया…” गाण्याबरोबरच माधुरी आणि करिश्माचा ‘दिल तो पागल हैं’ चित्रपटातील डान्स फेस ऑफ देखील पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळणार आहे. कलर्स वाहिनीवर रात्री ९.३० वाजता येत्या शनिवारी आणि रविवार हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सध्या नेटकरी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

“सुपरहिट जोडी”, “करिश्मा आहे तशीच आहे”, “एव्हरग्रीन साँग”, “सुनील शेट्टी आणि करिश्मा कपूर मस्तच!” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहे.