Sunita Ahuja Reaction on Govinda Komal Rani Swarnkar Lalbaug Visit : अभिनेता गोविंदाने सहकलाकार अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारबरोबर लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. याचे व्हिडीओ व्हायरल झाले असून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. त्याच दिवशी सकाळी गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी एकटीने लालबागाच्या राज्याचे दर्शन घेतले होते. एकाच दिवशी गोविंदा व सुनीता आहुजा यांनी स्वतंत्रपणे दर्शन घेतले. यावर आता सुनीता आहुजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गोविंदाने कोमल राणी स्वर्णकारबरोबर लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यावर सुनीता आहुजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांच्या हातामध्ये पाळीव श्वान होते. माणसांपेक्षा प्राण्यांवर प्रेम करा असे म्हणत सुनीता आहुजा यांनी अप्रत्यक्षपणे गोविंदावर पलटवार केला आहे. गोविंदाने लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून चर्चांना उधाण आले आहे.

गोविंदाबाबत काय म्हणाल्या सुनीता आहुजा?

सुनीता आहुजा म्हणाल्या, “माणसांवर कितीही प्रेम करा, काहीच उपयोग नाहीये. माणसे धोकाच देतात. श्वानांवर प्रेम करून बघा, ते कायम आपल्या जवळ राहतात. माणसांवर नाही तर जनावरांवर प्रेम करा. माणसे धोकेबाज असतात, त्यांच्यापेक्षा जास्त चांगले तर प्राणी आहेत.”

एअरपोर्टवर सुनीता आहुजा यांनी स्पष्ट शब्दांत गोविंदा व कोमल राणी स्वर्णकार यांनी लालबागच्या राजाचे एकत्र दर्शन घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले. यापूर्वीही गोविंदा अनेकदा कोमल राणी स्वर्णकारबरोबर फिरत असल्याने सुनीता यांनी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली होती. तसेच गोविंदा मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीबरोबर फिरत असून त्यांचे कथित अफेअर असल्याचा आरोप सुनीता आहुजा यांनी केला होता.

मागील काही काळापासून गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांचे वैवाहिक आयुष्य चर्चेत आले आहे. यापूर्वी ते घटस्फोट घेणार असल्याचे समोर आले होते. त्यानंतर सुनीता यांनी घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला असला तरी गोविंदा हा त्यांच्या कौटुंबिक फोटोतून गायब झाल्याचे दिसून आले. गणपतीवेळी गोविंदा कुटुंबाबरोबर दिसला असला तरी त्यावेळी सुनीता यांची अनुपस्थिती अनेकांच्या लक्षात आली. यानंतर आता लालबागच्या राजाच्या दर्शनावरून गोविंदा व सुनीता आहुजा हे पुन्हा चर्चेत आले आहेत.