अभिनेता गोविंदा आणि त्याच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटांचे अनेक चाहते होते. विनोदाचा अचूक टायमिंग, तितकाच सुंदर डान्स यामुळे गोविंदाचे सिनेमे १९९० च्या दशकात सुपरहिट झाले. त्याच्या चाहत्यांमध्ये महिलांचाही समावेश होता. चित्रपटाच्या सेटवर, दौऱ्यावर नेहमीच गोविंदाच्या आजूबाजूला महिला चाहत्यांचा गराडा असायचा. अशातच सुनीता आहुजा यांनी गोविंदाची पत्नी म्हणून कशी परिस्थिती हाताळली, त्यांच्यावर हिरोची पत्नी असण्याचा काय परिणाम झाला याची उत्तरं त्यांनी नुकतीच दिली आहे.

गोविंदाची पत्नी सुनीता यांनी सांगितलं की,  एका कॉन्सर्टमध्ये त्यांनी एका महिला चाहतीला मोठ्याने ओरडत गोविंदाचं नाव घेत बेशुद्ध झाल्याचं पाहिलं होतं. सुनीता म्हणाल्या की, एका हिरोची पत्नी होण्यासाठी अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं. अनेक गोष्टी सोडून द्याव्या लागतात, त्याशिवाय लग्न टिकवणं कठीण आहे.

हेही वाचा……म्हणून सुपरहिट सिनेमे देणाऱ्या गोविंदा आणि डेव्हिड धवनने एकत्र काम करणं केलं बंद, सुनीता आहुजांनी सांगितलं कारण, म्हणाल्या…

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी ‘टाईमआऊट विथ अंकित’ या पॉडकास्टमध्ये आपल लग्न, वैयक्तिक आयुष्यातील किस्से सांगितले. याच पॉडकास्टमध्ये गोविंदाच्या अनेक महिला चाहत्यांमुळे सुनीता यांना कधी असुरक्षित वाटलं का, अस विचारण्यात आलं. तेव्हा त्या म्हणाल्या, “मला त्याचं काही वाटलं नाही. त्याच्याभोवती महिला चाहत्यांचा गराडा असायचा. पण याबाबतीत तुम्हाला स्वतःवर आत्मविश्वास असावा लागतो. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं. एका हिरोची पत्नी होण्यासाठी तुम्हाला मन कठोर करावं लागतं, नाहीतर तुम्ही हिरोशी लग्न करू नका.”

त्यामुळे फरक पडला नाही….

सुनीता म्हणाल्या, “मला कधीच त्याचा महिला चाहत्या होत्या याचा फरक पडला नाही. शेवटी तोही माणूस आहे. पण कुठेही गेला तरी दिवसभर फिरून रात्री घरीच यायचा ना.”

हेही वाचा…सोनाक्षीने आंतरधर्मीय लग्नाचा निर्णय सांगितल्यावर ‘अशी’ होती शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया; झहीर इक्बाल सासऱ्यांबद्दल म्हणाला…

गोविंदाच्या स्टारडमचे महत्त्व कळत नव्हते

गोविंदाचे अनेक सिनेमे सुपरहिट होते. त्याचे अनेक चाहते होते यासाठी कधी त्याचा अभिमान वाटायचा का? असा प्रश्न विचारला असता, सुनीता म्हणाल्या, “मी तेव्हा खूप भोळी होते आणि गोविंदाच्या स्टारडमचं महत्त्व मला कळलं नव्हतं. मला तेव्हा फारसं समजत नव्हतं. मी फक्त २०-२१ वर्षांची होते. त्या वयात आयुष्याबद्दल फार काही माहिती नसतं. आजची मुलं हे सगळं समजून घेऊ शकतात, पण आम्ही तेव्हा खूप निरागस होतो.”

हेही वाचा…आलिया भट्टने लग्नानंतर दोन वर्षांनी बदलले नाव, स्वतःच केली घोषणा, म्हणाली…

गोविंदा आणि सुनीता जवळपास चार दशकांपासून एकत्र आहेत. या जोडप्याने १९८७ मध्ये लग्न केलं आणि त्यांनी जवळपास दोन वर्षं त्यांचा विवाह गुपित ठेवला होता, असं सुनीता यांनी सांगितलं.