Sunita Ahuja on Son Yashvardhan: सुनीता आहुजा अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. तसेच, त्या त्यांच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यांच्या अनेक वक्तव्यांची चर्चा होताना दिसते. गोविंदा व त्यांच्या नात्याबद्दलही त्या अनेकदा बोलतात.

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी गोविंदाबद्दल वक्तव्य केले आहे. त्यांचे हे वक्तव्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सुनीता आहुजा यांनी नुकतीच ‘मॅशेबल इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत सुनीता आहुजा गोविंदाबद्दल म्हणाल्या, “ते आताही छान दिसतात. पण, त्या काळी त्यांच्या डोक्यावर खरे केस होते; आता ते हेअर पॅच लावतात.”

“जेव्हा मी प्रेग्नंट होते…”

तसेच, मुलगा यशवर्धनमध्ये बॉलीवूडचे दिग्गज कलाकार धर्मेंद्र व अमिताभ बच्चन यांची झलक पाहायला मिळते, असे वक्तव्य सुनीता आहुजा यांनी केले. त्या म्हणाल्या, “माझा मुलगा माझा आवडता हीरो आहे. जेव्हा मी प्रेग्नंट होते, माझा मुलगा माझ्या पोटात होता, तेव्हा मी अमिताभजी व धर्मेंद्रजी या दोघांचेच फोटो पाहिले होते. माझ्या मुलाचे व्यक्तिमत्त्व अमिताभ बच्चन यांच्यासारखे झालेय आणि त्याचा चेहरा धर्मेंद्रजी यांच्यासारखा दिसतो. त्यामुळे मी खूप आनंदी आहे.”

यशवर्धनच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो वडिलांप्रमाणेच अभिनय क्षेत्रात काम करीत आहे. बागी व डिशूम या सिनेमांत त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही काम केले आहे. लवकरच तो साजिद खानच्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे.

सुनीता आहुजा लवकरच नेटफ्लिक्सवरील ‘लॉक अप’ या रिॲलिटी शोच्या दुसऱ्या पर्वात दिसणार आहेत. २०२४ मध्ये ‘टाइम आऊट विथ अंकित’ला दिलेल्या एका मुलाखतीत सुनीता आहुजा म्हणालेल्या की, मी ‘कॉफी विथ करण’मध्ये बोलावण्याची वाट पाहत आहे. बिग बॉसमध्ये सहभागी होण्याबद्दल त्या म्हणालेल्या की, त्यांनी मला बऱ्याचदा शोमध्ये सहभागी होण्यासाठी विचारलेलं आहे. त्यांनी मला बिग बॉस ओटीटीसाठीसुद्धा विचारलं आहे; पण मी त्यांना नकार दिला. मी बिग बॉस बघतसुद्धा नाही.

अनेकदा सुनीता आहुजा यांच्या वक्तव्यामुळे गोविंदा व त्यांच्या नात्याची चर्चा होताना दिसते. दरम्यान, आता लॉक अप या शोमध्ये सुनीता आहुजा यांना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.