Sunita Ahuja Says Govinda Wont Leave For Stupid Woman: ९० च्या दशकातील ज्या अभिनेत्याने एका पेक्षा एक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले, तो अभिनेता गोविंदा आहे. गोविंदाचे अनेक चित्रपट गाजले. गेल्या काही महिन्यांपासून मात्र गोविंदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा लग्नाच्या ३८ वर्षांनंतर वेगळे होणार, अशा चर्चा मोठ्या प्रमाणात झाल्या. मात्र, या चर्चा खोट्या असल्याचे सुनीता आहुजाने म्हटले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीता आहुजाने घटस्फोटाबद्दल वक्तव्य केले आहे.

गोविंदा माझ्याशिवाय राहू शकत नाही

सुनीता आहुजाने नुकताच ‘टाइम्स नाऊ’बरोबर संवाद साधला. यावेळी घटस्फोटांच्या चर्चांवर सुनीता आहुजा म्हणाली, “ज्या दिवशी आम्ही घटस्फोट घेऊ, त्यादिवशी माझ्या आणि गोविंदाच्या तोंडून लोकांना ऐकायला मिळेल. पण, गोविंदा माझ्याशिवाय राहू शकत नाही आणि मीदेखील गोविंदाशिवाय राहू शकत नाही. गोविंदा कोणत्याही मूर्ख व्यक्तीसाठी किंवा मूर्ख स्त्रीसाठी त्याच्या कुटुंबाला सोडणार नाही.”

“सगळेजण अफवा, अफवा म्हणतात, पण हे सत्य आहे की नाही हे तर तपासून पाहा. कोणाचे धाडस असेल तर त्याने मला थेट याबद्दल विचारले पाहिजे. कोणीतरी अफवा पसरवत आहे, म्हणून त्यावर विश्वास ठेवणे चुकीचे आहे. जर असं कधी काही घडलंच तर मी पहिली व्यक्ती असेन, जी याबद्दल मीडियाशी संवाद साधेन. पण, प्रामाणिकपणे मला वाटते की देव आमचं घर कधीही तोडणार नाही.”

गोविंदा बी.कॉम.च्या शेवटच्या वर्षात होता, त्यावेळी सुनीता आहुजा नववीमध्ये शिकत होती, त्यावेळी त्यांची पहिली भेट झाली होती. इंडस्ट्रीमध्ये लोकप्रियता मिळण्याआधी सुनीता व गोविंदा यांनी १९८६ साली लग्नगाठ बांधली. मात्र, त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणालाही सांगितले नाही. त्यांना यशवर्धन आहुजा आणि टीना आहुजा ही मुले आहेत. गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

दरम्यान, गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा लग्नानंतर ३७ वर्षांनी घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर अभिनेत्याचे वकील ललित बिंदल यांनी स्पष्टीकरण दिलं. सुनीता आहुजाने सहा महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता, त्यानंतर या दोघांमधले मतभेद सोडवले असून हे जोडपे सध्या एकत्र असल्याचे त्यांनी म्हटले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हिरो नंबर १’, ‘कुली नंबर १’, ‘पार्टनर’, ‘आँखियों से गोली मारे’, अशा अनेक चित्रपटांतून गोविंदा (Govinda) यशाच्या शिखरावर पोहोचला. ९० च्या दशकात अभिनेता प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर त्याच्या करिअरला उतरती कळा लागल्याचे पाहायला मिळाले. गोविंदाने काही दिवसांपूर्वीच पुनरागमन करणार असल्याचे वक्तव्य केले आहे. आता तो कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.