सुनीता आहुजा कुठल्या न कुठल्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतात. अशातच आता त्यांनी बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन आणि रेखा यांच्याबद्दल भाष्य केलं आहे. याचवेळी त्यांनी भविष्यात त्यांच्या मुलाने लग्न केलं तर त्या कशा सासूबाई असतील याबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांना बॉलीवूडमधील तीन अभिनेत्रींपैकी एकिची निवड करायला सांगितल्यानंतर त्यांनी कोणाची निवड केली नाही.

सुनीता आहुजा अनेकदा स्पष्टपणे त्यांची मतं, प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. अशातच आता त्यांनी नुकतीच बालाजी टेली फिल्मला दिलेल्या मुलाखतीत जया बच्चन व रेखा यांच्याबद्दल बोलताना त्यांना या अभिनेत्रींपैकी कोणासारखी सासू व्हायला आवडेल असं विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी या दोन्ही अभिनेत्री त्यांना खूप आवडतात आणि त्या त्यांचा खूप आदर करतात पण यापैकी कोणाहीसारखी सासू त्यांना बनायचं नसल्याचं त्यांनी म्हटलं.

जया बच्चन व रेखाबद्दल काय म्हणाल्या सुनीता आहुजा?

मुलाखतीत त्यांना रॅपिड फायरमध्ये सारा अली खान, अनन्या पांडे, पलक तिवारी यापैकी कोणाची सून म्हणून निवड करायला आवडेल असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “यापैकी कोणीही असेल असं मला वाटत नाही. कारण यशची परदेशी मुलींना जास्त पसंती असते.” पुढे त्यांना जर तुम्हाला सासू व्हायचं असेल तर कोणासारखी सासू व्हाल जया बच्चन की रेखा असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “या दोघीही माझ्या आवडत्या आहेत, पण मी सुनीता आहुजासारखीच सासू होणं पसंत करेन. ते मोठे लोक आहेत. मी माझी सासू होती तशीच सासू होईल.”

सुनीता यांनी या मुलाखतीत गोविंदाबरोबरच्या लग्नाबद्दल आणि प्रेमाबद्दलही भाष्य केलं आहे. त्यांनी त्यांचं गोविंदावर एकतर्फी प्रेम असून त्यांच्या घरी कधीही त्याची कोणतीही सहअभिनेत्री आली नाही कारण त्या खूप कडक शिस्तीच्या होत्या असं म्हटलं आहे.

दरम्यान, गोविंदा आणि सुनीता नेहमी चर्चेत असतात. आता नुकतच त्यांनी लालगबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर तिथेच गोविंदा त्याची सहअभिनेत्री आणि कथित गर्लफ्रेंड कोमल राणीबरोबर दर्शनासाठी गेल्याने त्यांचे फोटो व व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आणि पुन्हा एकाच ठिकणी वेगवेगळे गेल्याने चर्चा सुरू झाली.