Govinda on Sunita Ahuja: गोविंदा काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत रूपा या सिनेमातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार असल्याची घोषणा केली होती. तसेच, या सिनेमात कोमल राणी स्वर्णकार दिसणार असल्याचे सांगत तिची ओळख करून देण्यात आली होती.

त्यानंतर गोविंदा व कोमल राणी स्वर्णकार मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर ते पुन्हा एकदा एकत्र दिसले. आता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने या सगळ्या प्रकारावर मत व्यक्त केले.

“त्याला थोडी तरी लाज वाटायला हवी”

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पापाराझी सुनीता आहुजाला गोविंदा कोमलबरोबर चित्रपटाचे प्रमोशन करत असल्याबद्दल विचारले. त्यावर सुनीता म्हणाली, “चित्रपट बनायला तरी हवा. चित्रपट बनून झाल्यानंतर त्याचे प्रमोशन होईल. प्रमोशनच्या आधीच ते एकत्र फिरत आहेत. मी काय बोलू? मुलीच्या वयाच्या मुलींना घेऊन फिरत आहे. त्याला थोडी तरी लाज वाटायला हवी आणि काहीतरी स्टॅण्डर्ड तर पाहिजे.”

पुढे ती कोमलला उद्देशून म्हणाली, “तुझा शुगर डॅडी इतका श्रीमंत आहे तर, कपडे तर चांगले घाल. आम्ही बघा किती स्टाईलमध्ये राहतो.” शेवटी त्या गोविंदाला म्हणाल्या, “तो वेडा झाला आहे. हे खूप वाईट आहे.” याआधीही सुनीताने गोविंदाबद्दल अनेक गोष्टी बोलल्या आहेत. सहअभिनेत्रींबरोबर रिलेशनमध्ये असल्याचे वक्तव्य केले आहे.

आता गोविंदाने सुनीताच्या अशा वक्तव्यांवर उत्तर दिले आहे. ‘इन्स्टंट बॉलीवूड’शी संवाद साधताना गोविंदा म्हणलाा, “देशातील सगळ्या मोठ्या कलाकारांनी तरुण मुलींबरोबर काम केले आहे. लोकांच्या मनातून मी उतरावे, माझी बदनामी व्हावी, यासाठी तुम्ही काहीही बोलत आहात. देवाच्या कृपेने प्रसिद्धी, मान-सन्मान, संपत्ती सर्व काही मिळाले आहे. तुमच्याकडे हे सर्व आहे, याचा अर्थ असा नाही की ज्याच्याकडे नाही त्याचा तुम्ही अपमान केला पाहिजे. तुम्ही थोडं तुमच्या हद्दीत राहा.” याचबरोबर तो असेही म्हणाला की सुनीताजी अलीकडे तुम्ही शिव्या मोठ्या प्रमाणात देत आहात. तरुण पीढी शिकत असते. तेही उद्या तसेच बोलायला लागली तर लाज वाटेल. तुमच्याकडून हे अपेक्षित नाही.

गोविंदाची महत्त्वाची भूमिका असलेला रंगीला राजा हा सिनेमा २०१९ ला प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता रूपा या सिनेमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच, दुनियादारी या सिनेमातही तो दिसणार आहे.आता गोविंदा या सिनेमांतून पुन्हा एकदा कमाल करू शकेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.