पुन्हा एकदा तारा सिंगची भूमिका साकारण्यासाठी सनी देओलने आकारले 'इतके' मानधन, आकडा ऐकून व्हाल थक्क | Sunny deol charged huge amount to act in gadar 2 film | Loksatta

पुन्हा एकदा तारा सिंगची भूमिका साकारण्यासाठी सनी देओलने आकारले ‘इतके’ मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क

२१ वर्षांनंतर ‘गदर’ चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

sunny deol

‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या सिक्वेलची सध्या चांगलीच चर्चा आहे. ‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमिषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनाचे अवचित्य साधून या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. तर आता या चित्रपटासाठी सनी देओलने किती मानधन आकारलं हे समोर आलं आहे.

‘गदर’ चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातल्यावर ‘गदर २’ चित्रपटात सनी देओल पुन्हा एकदा तारा सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा एक पोस्टर प्रदर्शित झालं होतं. त्यात तारा सिंग म्हणजेच सनी देओल हातामध्ये मोठा हातोडा घेऊन उभा असलेला दिसला. तर त्यानंतर या चित्रपटातील एका ॲक्शन सीनचा बिहाइंड द सीन व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यात तो चक्क खांब तोडताना दिसला. हे सगळं करण्यासाठी सनी देओलने खूप मेहनत घेतली आहे आणि त्याचबरोबर त्याने मोठं मानधनही आकारलं आहे.

आणखी वाचा : Video: ‘गदर २’ चित्रपटातील ॲक्शन सीन लीक, तारा सिंगचा जबरदस्त अंदाज एकदा पाहाच

गेले अनेक महिने सनी देओल या चित्रपटावर काम करत होता. विविध ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण केलं गेलं आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याचे समोर आलं होतं. तर रिपोर्टनुसार या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा तारा सिंग साकारण्यासाठी सनी देओलने ५ कोटी रुपये मानधन आकारलं आहे. या चित्रपटातील तो सर्वाधिक फी घेणारा अभिनेता आहे.

हेही वाचा : याला म्हणतात स्वॅग! आलिशान गाडीने नाही तर थेट हेलिकॉप्टरमधून शूटिंगला येतो ‘हा’ भारतीय अभिनेता

२००१ प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता जवळपास २१ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गदर २’ ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 16:31 IST
Next Story
“मला हा चित्रपट…” शाहरुख खानच्या ‘पठाण’बद्दल योगी आदित्यनाथ यांचे मोठे वक्तव्य