सनी देओल अशा कलाकारांपैकी एक आहे, जो इतरांच्या, विशेषतः त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कधीच हस्तक्षेप करत नाही. तो नेहमीच त्याच्या कामात व्यग्र असतो. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की एकदा रवीना टंडनसाठी सनी देओल थेट अक्षय कुमारशी भिडले होता? यामागचं नेमकं कारण काय होतं, चला जाणून घेऊया.

एकेकाळी अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्यात खूपच घट्ट नातं होतं. दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा त्यावेळी चांगल्याच रंगल्या होत्या आणि ते सतत चर्चेत असायचे. मात्र, अचानक दोघांचं ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली. असं म्हटलं जातं की, या ब्रेकअपमुळे रवीना टंडन खूपच खचली होती. रवीना व अक्षय यांच्या रिलेशनशिपबद्दल आजही अनेकदा चर्चा होत असते.

रवीना टंडनला झालेले अश्रू अनावर

हिंदुस्तानच्या वृत्तानुसार रवीनाला कामावर लक्ष केंद्रित करणं कठीण जात होतं. त्यावेळी ती ‘जिद्दी’ चित्रपटाचं शूटिंग करत होती. सेटवर ती खूपच अस्वस्थ आणि त्रस्त दिसत होती, हे सगळ्यांच्याच लक्षात येत होतं. सनी देओलने रवीनाला तिची अडचण काय आहे, असं विचारलं. त्यानंतर रवीनाने रडत-रडत अक्षयबरोबरच्या ब्रेकअपची संपूर्ण गोष्ट सनीला देओलला सांगितली.

रवीनासाठी अक्षय कुमारशी भिडला सनी देओल

रिपोर्ट्सनुसार, रवीनाची अवस्था पाहून सनी देओल खूप अस्वस्थ झाला. त्यानंतर तो थेट अक्षय कुमार यांच्याकडे गेला आणि त्याला या प्रकरणावरून जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये वादही झाल्याचं म्हटलं जातं. रवीनासाठी अक्षयशी झालेल्या या वादानंतर सनी देओल आणि अक्षय कुमार यांच्यातही मतभेद निर्माण झाल्याची चर्चा होती.

सनी देओल आणि अक्षय कुमार यांनी एकत्र ‘जानी दुश्मन: एक अनोखी कहानी’ या चित्रपटात काम केलं आहे. याशिवाय दोघे ‘ब्लँक’ चित्रपटातही झळकले होते. या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत होता, तर अक्षय कुमारने यात कॅमिओ केला होता.

दरम्यान, सनी देओलच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो आता ‘बटवारा १९४७’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सनी देओलबरोबर प्रीती झिंटा, त्याचा मुलगा करण देओल आणि शबाना आझमी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केलं असून आमिर खानने चित्रपटाची निर्मिती केली आहे.