Sunny Deol reveals about 56 crore debt: सनी देओलचा ‘गदर २’ हा सिनेमा २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. अनिल शर्मांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा सनी देओलच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा सिनेमा मानला जातो. हा चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’चा सीक्वेल होता.

सनी देओल नेमकं काय म्हणाला?

२००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या गदर या सिनेमात सनी देओल महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. मात्र, या सिनेमानंतर अभिनेत्याला कठीण काळाचा सामना करावा लागला. शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता म्हणाला, “‘गदर’बरोबरच मी ‘इंडियन’ हा चित्रपटातही काम केला. तो ‘लगान’ आणि त्यावेळच्या इतर चित्रपटांपेक्षा हिट ठरला होता. ‘लगान’च्या तुलनेत त्याने दोन ते तीन पट कमाई केली होती.. ‘गदर’ने तर त्याहून जास्त कमाई केली.

एन. महाराजन दिग्दर्शित ‘इंडियन’ हा सिनेमा ‘गदर’च्या काही महिन्यांनंतर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे ४३ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ने भारतात जवळजवळ ३४ कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘गदर’ आणि ‘लगान’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. ‘गदर’ भारतात बॉक्स ऑफिसवर तब्बल ७७ कोटी रुपयांची कमाई केली होती.

“मी फक्त पैशांसाठी…”

सनी देओल पुढे म्हणाला, “अचानक कॉर्पोरेट कंपन्या इंडस्ट्रीमध्ये आल्या आणि चित्रपटांता फॉरमॅट बदलला. त्यानंतर मला योग्य विषय आणि योग्य निर्माते-दिग्दर्शक का मिळत नव्हते, हे मला माहीत नाही.”

२००५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘जो बोले सो निहाल’ हा चित्रपटही वादाच्या भोवऱ्यात सापडला. शीख समुदायाकडून आक्षेप घेण्यात आला होता. दिल्लीतील एका थिएटरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर ४९ जण जखमी झाले होते.

सनी देओलच्या करिअरमध्ये चढ-उतार आले, आर्थिक संकटांचा सामना करावा लागला, पण तरीही फक्त पैशांसाठी कार्यक्रमांना हजेरी लावली नाही असेही अभिनेत्याने सांगितले. तो म्हणाला, “मी फक्त पैशांसाठी गोष्टी करू शकत नाही. पण, प्रामाणिकपणे सांगायचे तर मी खूप आनंदी आहे. जेव्हा माझ्यावर कर्ज होते, त्यावेळीही मी आनंदात जगत होतो. “

याबद्दल बोलताना सनी म्हणाला, “माझ्याकडे जे पैसे माझे होते, ते माझेच होते. ते मी कोणाकडूनही उधार घेतले नव्हते. मी कोणाचंही देणं लागत नव्हतो. मला फक्त माझी स्वतःची मालमत्ता विकून ते कर्ज फेडायचं होतं.” सनी देओलने २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘घायल रिटर्न्स’ या सिनेमासाठी हे कर्ज घेतले होते. या चित्रपटाची निर्मिती करण्याबरोबरच त्याने दिग्दर्शन आणि अभिनयाची जबाबदारीही सांभाळली होती. मात्र, त्याला यामध्ये अपयश आले.

दरम्यान, सनी देओल नुकताच बटवारा: १९४७ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.