scorecardresearch

Premium

सनी देओलला आवडत नाही शाहरुख अन् अक्षय कुमारची ‘ही’ गोष्ट; खुलासा करत म्हणाला…

करण जोहरच्या चॅटशोमध्ये सनीने शाहरुख आणि अक्षय कुमारबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

sunny sharukh and akshay
सनी देओलला आवडत नाही शाहरुख अन् अक्षय कुमारची 'ही' गोष्ट

काही दिवसांपूर्वीच करण जोहरचा कॉफी विथ करणचा आठव्या सीझनला सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने हजेरी लावली होती. आता दुसऱ्या भागात सनी देओल आणि बॉबी देओल हजेरी लावली आहे. दरम्यान करणच्या या चॅटशोमध्ये सनी आणि बॉबीने अनेक गुपिते उलगडली आहेत. दोघांनी करिअरबरोबर वैयक्तिक गोष्टींवरही दिलखुलास गप्पा मारल्या.

हेही वाचा- सनी देओलची पत्नी पूजा देओल लाईमलाईटपासून लांब का राहते? करण जोहरच्या शोमध्ये अभिनेत्याने सांगितलं कारण, म्हणाला…

Loksatta samorchya bakavarun Indian Economy developed countries income
समोरच्या बाकावरून: सध्याचे ६ टक्के आत्मगौरवापुरतेच!
Narendra Modi and Rahul Gandhi
“वाराणसीत तरुणांना नशेत नाचताना पाहिलं”, राहुल गांधीच्या टीकेवर मोदींचा पलटवार; म्हणाले, “जे स्वतः…”
Devendra Fadnavis on AShok Chavan
Ashok Chavan Join BJP : अशोक चव्हाणांना भाजपात कोणती जबाबदारी मिळणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले…
Uttar Pradesh
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचा नवा प्रयोग, जाट समाजाच्या मतांसाठी आरएलडीशी युती? वाचा नेमकी रणनीती काय?

दरम्यान या शोमध्ये सनीने अनेक कलाकारांबाबत वक्तव्य केलं आहे. रॅपिड फायर राउंडदरम्यान सनीने शाहरुख खान आणि अक्षय कुमारमधील एक चांगला आणि एक वाईट गुण सांगितला. शाहरुखबाबत बोलताना सनी म्हणाला, “शाहरुख खान मेहनती आहे, पण त्याने कलाकारांची ओळख एक वस्तू म्हणून बनवली आहे.” तर अक्षय कुमारबद्दल बोलताना सनी म्हणाला, मला अक्षयचे शिस्तबद्ध राहणे आवडते परंतु दरवर्षी मोठ्या प्रमाणात चित्रपट करणे योग्य नाही.”

हेही वाचा- धर्मेंद्र आणि शबाना आझमींच्या लिपलॉक सीनवर सनी, बॉबी देओलने पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

एवढंच नाही तर सनीने सलमान खानबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. सनी म्हणाला, “सलमान खानचं हदय खूप मोठं आहे. सलमानने अनेकदा मला त्याच्या घरी पार्टीला बोलवलं होतं. पण मी जाऊ शकलो नाही. पण ‘गदर २’ च्या यशानंतर आयोजित केलेल्या पार्टीत माझ्या एका निमंत्रणावर तो आला होता.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sunny deol reveals what he doesnt like about shah rukh and akshay in koffee with karan 8 dpj

First published on: 02-11-2023 at 16:54 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×