तारा सिंग परतणार! हातात हातोडा, करारी लूक... पाहा 'गदर २'मधील सनी देओलची खास झलक, पोस्टर शेअर करत म्हणाला... | Sunny deol shared his first look of him from gadar 2 film | Loksatta

तारा सिंग परतणार! हातात हातोडा, डॅशिंग लूक… पाहा ‘गदर २’मधील सनी देओलची खास झलक, पोस्टर शेअर करत म्हणाला…

नव्या पोस्टरमधून त्याचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांसमोर येत आहे.

sunny deol

२ दशकापूर्वीच्या सुपरहिट ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या सिक्वेलची सध्या चांगलीच चर्चा आहे. ‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमिषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आता आज प्रजासत्ताक दिनाचे अवचित्य साधून या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

‘गदर २’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झालं असून या चित्रपटातील सनी देओलची पहिली झलक काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांसमोर आली होती. यात तो बैलगाडीचा चाक उचलताना दिसला. तर आता नव्या पोस्टरमधून त्याचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांसमोर येत आहे. सनी देओलने हे पोस्टर शेअर करत एक खास पोस्ट लिहिली.

आणखी वाचा : चित्रपटगृहात सुपरहिट पण IMDB वर निघाली ‘पठाण’ची हवा, ‘इतक्या’ प्रेक्षकांनी दिलं १० पैकी १ रेटिंग

‘गदर २’च्या या नवीन पोस्टरमध्ये सनी देओलचा डॅशिंग लूक पाहायला मिळत आहे. त्याने पगडी घातली आहे आणि हिरव्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. त्याच्या हातात मोठा, जड हातोडा घेऊन तो चालताना दिसत आहे. हे पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं, “हिंदुस्तान झिंदाबाद है, झिंदाबाद था और झिंदाबाद ही रहेगा… या स्वातंत्र्य दिनाला आम्ही घेऊन येत आहोत भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा सिक्वेल. ‘गदर २’ ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे.” त्याच्या या पोस्टवर कमेंट्स करत त्याचे चाहते त्याला तारा सिंगच्या भूमिकेत पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रचंड आतुर झाले असल्याचं सांगत आहेत.

हेही वाचा : Video: आधी हातपंप, आता थेट बैलगाडीचं चाक; ‘गदर २’ चित्रपटातील सनी देओलचा जबरदस्त लूक बघाच

२००१ च्या ‘गदर: एक प्रेम कथा’ चित्रपटात सनीने तारा सिंग ही भूमिका साकारली होती. त्यावेळी हा चित्रपट मोठा ब्लॉकबस्टर ठरला होता. २००१ प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता जवळपास २१ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 14:00 IST
Next Story
Pathaan Box Office Collection: ‘पठाण’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा खरा आकडा समोर; पहिल्या दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी