Border 2 Release Date: जेपी दत्ता दिग्दर्शित ‘बॉर्डर’ चित्रपट १९९७ साली प्रदर्शित झाला होता. पण आजही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो. तसंच चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांच्या ओठांवर आजही आहेत. काही दिवसांपूर्वी ‘बॉर्डर २’ चित्रपटाची घोषणा निर्मात्यांनी केली होती. त्यानंतर आता प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

अभिनेता सनी देओलच्या ‘गदर २’नंतर त्याचे चाहते ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या सीक्वलसाठी खूप उत्सुक आहेत. २७ वर्षांनंतर ‘बॉर्डर २’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. पण या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा जेपी दत्ता नाही तर अनुराग सिंह सांभाळणार आहेत. अनुराग सिंह यांनी याआधी अक्षय कुमारचा ‘केसरी’, ‘पंजाब १९८४’ आणि ‘जट अँड जुलियट’सह अनेक सुपरहिट चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

हेही वाचा – “आमचा तुम्हाला बिनशर्त पाठिंबा!” तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी खास पोस्ट; म्हणाली, “इतरांसाठी जगणारा माणूस…”

सनी देओच्या ‘बॉर्डर २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेचा खुलासा तरण आदर्शने त्याच्या ‘एक्स’वरील पोस्टमधून केला आहे. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं आहे, “सनी देओल, जेपी दत्ता आणि भूषण कुमारने प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ‘बॉर्डर २’ चित्रपट २३ जानेवारी २०२६ला प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून प्रदर्शित होणार आहे.”

हेही वाचा – “हा हिरो प्रत्यक्षात येऊन माझा तारणहार बनू शकेल का?” विजू मानेंची राज ठाकरेंसाठी पोस्ट, म्हणाले, “तो दिवस लवकर येवो”

हेही वाचा – Video: “बाल अत्याचाराला खतपाणी…”,’पारू’ मालिकेचा नवा प्रोमो पाहून भडकले नेटकरी, म्हणाले, “निव्वळ फालतूपणा”

माहितीनुसार, ‘बॉर्डर २’ चित्रपटात सनी देओलसह पहिल्यांदाच आयुष्यमान खुराना काम करणार आहे. पण याबाबत अद्याप निर्मात्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. ‘बॉर्डर’ चित्रपटात सनी देओलबरोबर सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, राखी गुलजार, पूजा भट्ट, तब्बू प्रमुख हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकले होते. आता हे कलाकार ‘बॉर्डर २’ चित्रपटात पाहायला मिळणार की नाही? हे आता येत्या काळातच स्पष्ट होईल.