sunny deol talks about how he was typecast for the action hero image | Loksatta

एकाच पठडीतल्या भूमिका केल्याने वैतागला सनी देओल; म्हणाला, “ढाई किलो का…”

आगामी चित्रपटातला सनी देओलचा लूक समोर आला आहे.

एकाच पठडीतल्या भूमिका केल्याने वैतागला सनी देओल; म्हणाला, “ढाई किलो का…”
येत्या एक-दोन वर्षांमध्ये त्याचे 'सूर्या', 'अपने २' असे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहेत.

संजय दत्त, मिथुन चक्रवर्ती, जॅकी श्रॉफ आणि सनी देओल यांच्या आगामी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या चित्रपटाच्या निमित्ताने ऐंशी-नव्वदच्या दशकातील अ‍ॅक्शन हिरो एकत्र येणार आहेत. हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘द एक्सपेंडेबल्स’ (The Expendables) या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेता सनी देओल एका नव्या अवतारामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सप्टेंबर २०२२ मध्ये सनी देओलचा ‘चूप : रिव्हेन्ज ऑफ द आर्टिस्ट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये त्याने एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. तो सध्या त्याच्या मुलासह ‘अपने २’ या चित्रपटाची तयारी करत आहेत. येत्या एक-दोन वर्षांमध्ये त्याचे ‘सूर्या’, ‘अपने २’ असे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहेत. त्याचा ‘गदर’ सुपरहिट चित्रपटाचा रिमेक येणार आहे असेही म्हटले जात आहे.

आणखी वाचा – “बलात्कार करण्यासाठी…”, साजिद खानवर मॉडेल नम्रता सिंहचे गंभीर आरोप

गेल्या काही वर्षांमध्ये सनी देओलचे चित्रपट फ्लॉप होत आहेत. एक काळ असा होता, जेव्हा त्याच्या नावावर चित्रपट चालायचे. आता त्याने या आगामी चित्रपटांच्या मदतीने बॉलिवूडमध्ये पुन्हा कमबॅक करण्याचा निर्धार केला आहे. एका मुलाखतीमध्ये सनी देओलने त्याच्या पुढील वाटचालीबद्दल माहिती दिली. ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला, “मी सध्या माझ्या कारकीर्दीच्या सर्वात सुखकर टप्प्यावर आहे. ओटीटीसारख्या माध्यमांमुळे कलाकारांना कोणत्याही प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारायची मुभा मिळत आहे. अभिनेत्यांना बॉक्स ऑफिस कलेक्शनचा ताण नसतो. त्यामुळे स्क्रिप्ट वाचून हा चित्रपट हिट होईल की नाही हा विचार मनात न आणता त्याबाबत तुम्ही निर्णय घेऊ शकता.”

आणखी वाचा – वधू-वरांचा फोटो, आकर्षक रंग अन् बरंच काही; हार्दिक जोशी-अक्षया देवधरच्या लग्नपत्रिकेचा फोटो समोर

तो पुढे म्हणाला, “मला नेहमी टाइपकास्ट केले गेले. त्या-त्या भूमिका माझ्यावर लादल्या गेल्या. ‘ढाई किलो का हाथ’ आणि तेव्हाच्या अ‍ॅक्शन हिरोच्या इमेजमुळे मला कधीही वेगळ्या भूमिकांसाठी विचारले गेले नाही. लोक माझ्याकडे त्याच एका साच्यातल्या व्यक्तिरेखा घेऊन यायचे. पण आता मी नवनवे प्रयोग करुन पाहणार आहे. एक अभिनेता म्हणून मी नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. कोणतीही इमेज जपण्याचा प्रयत्न करावा लागणार नसल्यामुळे मी खूप आनंदी आहे.”

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-11-2022 at 17:10 IST
Next Story
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रणवीर सिंगचा डंका; ‘पद्मावत’सह ‘या’ दोन भव्य चित्रपटांचे होणार स्क्रीनिंग