scorecardresearch

“ते लोक खूप…” सनी देओलने व्यक्त केलेली पाकिस्तानला जायची इच्छा, व्हिडीओ व्हायरल

खुद्द सनीने एका मुलाखतीत पाकिस्तानला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Gadar-2-Sunny-deol
सनी देओल व अमिषा पटेलची मुख्य भूमिका असलेला 'गदर' चित्रपट भारत-पाकिस्तान फाळणीवर आधारित होता.

सनी देओलच्या बहुप्रतिक्षीत ‘गदर’ चित्रपटाचा सिक्वेल २२ वर्षांनी यंदा ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे आणि प्रेक्षक चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल उत्सुक आहेत. सनी देओल व अमिषा पटेलची मुख्य भूमिका असलेला ‘गदर’ चित्रपट भारत-पाकिस्तान फाळणीवर आधारित होता.

राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीला अटक

सनी देओल ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. तो राजकारणात सक्रिय झाला असला तरी बॉलिवूडमध्येही काम करत आहे. त्याचे चाहते फक्त भारतातच नाही, तर पाकिस्तानमध्येही आहेत. एकदा तर खुद्द सनीने पाकिस्तानला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. पाकिस्तानचे लोक खूप प्रेमळ आहेत आणि आपल्याला पाकिस्तानला जायचं आहे, असं त्याने ‘आप की अदालत’ या शोमध्ये म्हटलं होतं.

Video: आदिल खान गुन्हेगार? राखी सावंतनेच केला पतीबद्दल गौप्यस्फोट; म्हणाली, “म्हैसूर पोलीस…”

तू पाकिस्तानमध्ये जाशील का, असं विचारल्यावर सनी देओल म्हणाला होता, “असं काही नाही. जेव्हा जावं लागेल तेव्हा नक्की जाईन. कारण तिथले लोक माझ्यावर खूप प्रेम करतात. मी बर्‍याचदा विमानतळावर त्यांना भेटतो, ते ई-मेलवर पाठवतात, परदेशात भेटतात, तेव्हा ते खूप प्रेमाने भेटतात. कारण तिथल्या कुटुंबांमध्ये असे गैरसमज नसतात. काही मोजके लोक आहेत जे असे गैरसमज निर्माण करतात,” असं सनीने त्यावेळी म्हटलं होतं.

पाकिस्तानला गेला होता सनी देओल

गुरू नानक देव यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त करतारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनात सहभागी होण्यासाठी सनी देओल पाकिस्तानला गेला होता. परतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना “माझा पाकिस्तानचा दौरा खूप छान होता. पाकिस्तानमध्ये लोकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. ही शांततेची एक नवीन सुरुवात आहे आणि प्रत्येकाने प्रेमाने राहावं, असं मला वाटतं,” अशा शब्दांत सनीने प्रतिक्रिया दिली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 14:41 IST