अभिनेत्री सनी लिओनीने काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हिंदी चित्रपटांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांना आपलंस केलं. परदेशात राहणाऱ्या सनीला हिंदी भाषा अगदी उत्तम बोलता येते. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिला फारसं हिंदी येत नसावं असं अनेक लोकांना वाटलं. पण तिने दिलेल्या बऱ्याच मुलाखतींमध्ये सनी उत्तम हिंदी भाषा बोलताना दिसली. आताही ती बऱ्याचदा हिंदी भाषेमध्येच संवाद साधताना दिसते. तिचा पापाराझी छायाचित्रकारांना हिंदी भाषेमध्ये उत्तर देतानाचा व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सनी पंजाबी तसेच हिंदी भाषा उत्तम बोलते. हे तुम्हीही तिच्या अनेक मुलाखतींमधून अनुभवलं असेल. सध्या सनी काही कामानिमित्त मुंबईबाहेर गेली आहे. यादरम्यान मुंबई विमानतळावर तिला पापाराझी छायाचित्रकारांनी घेरलं. यावेळी पापाराझी छायाचित्रकारांना तिने आपल्याला उत्तम हिंदी येत असल्याची आठवण करून दिली.

pet dog helped the owner to plant a tree Emotional Video
अरे देवा! मदत करायला गेला अन् मालकाचं काम वाढवून आला; VIDEO चा शेवट पाहून पोट धरून हसाल
woman mistakenly sat on another person bike instead of boyfriend funny video
तरुणी प्रियकराऐवजी अनोळखी व्यक्तीच्या गाडीवर जाऊन बसली अन् मग..विचित्र घटनेचा VIDEO
nitish kumar goverment vs governor
विद्यापीठांच्या मुद्द्यावरून नितीश सरकार आणि राज्यपाल आमने-सामने; ‘या’ वादाला कारणीभूत कोण?
Fact check on pm Narendra Modi waving hand to fish viral video
सुदर्शन सेतू उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदींनी ‘माशांना’ दाखवला हात? जाणून घ्या, व्हायरल Video मागील सत्य

पाहा व्हिडीओ

सनीने मुंबई विमानतळावर प्रवेश करताच पापाराझी छायाचित्रकारांनी तिला घेरलं. दरमयान छायाचित्रकारांनी “धन्यवाद, उद्या भेटू.” असं तिला हिंदी भाषेमध्ये म्हटलं. हे ऐकल्यानंतर सनीने त्यांना अगदी सडेतोड उत्तर दिलं. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनीही तिचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – Video : …अन् मृणाल कुलकर्णी यांच्या लेकाने चक्क ताज हॉटेलमध्ये बायकोला दिलं वाढदिवसाचं सरप्राईज, व्हिडीओ व्हायरल

ती म्हणाली, “तुम्हाला असं वाटतं का मी हिंदी भाषेमध्ये बोलू शकत नाही? तुम्हीच इंग्रजी भाषेमध्ये संवाद साधता तर मी काय करू?” तसेच “धन्यवाद, उद्या भेटू.” असं पापाराझी छायाचित्रकारांचं वाक्य ती पुन्हा बोलताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सनीचा हा भन्नाट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.