Sunny Leone’s daughter Nisha Kaur Weber is earning money at age 10: फराह खानने दिग्दर्शनाच्या माध्यमातून, तसेच कोरिओग्राफीच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये तिचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तसेच, ती विविध रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही काम करते.
अलीकडे फराह खान तिच्या यूट्यूब व्हिडीओमुळे अनेकदा चर्चेत असते. ती व तिचा कुक दिलीप अनेक कलाकारांच्या घरी जातात. त्या निमित्तानं चाहत्यांना सेलिब्रिटींची घरं पाहायला मिळतात. त्यांचे घर कसे आहे, ते कसे सजवले आहे. तसेच, ते कसे राहतात, त्यांची लाइफस्टाईल कशी आहे, तसेच आपल्या आवडत्या कलाकारांच्या घरात कोणकोणत्या सोई-सुविधा आहेत अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात.
फराह खान सेलिब्रिटींच्या घरी जाते, तेव्हा कलाकार काही खास पदार्थ बनवतात. ते पदार्थ कसे बनवले जातात, याची झलकदेखील पाहायला मिळते. यादरम्यान, फराह त्यांच्याशी गप्पा मारते. कलाकारही त्यांच्या आयुष्यातील किस्से सर्वांना सांगते.
आता फराह खानने नुकतीच सनी लिओनीच्या घरी भेट दिली. तिने सनी व तिचा पती डॅनिय,ल वेबेरशी गप्पा मारल्या. यावेळी सनीने खुलासा केला की, तिची १० वर्षांची मुलगी निशा स्वत: पैसे कमावते.
सनी लिओनीची १० वर्षांची लेक कमावते पैसे
सनी म्हणाली, “तिला माहीत आहे की,आम्ही तिला दत्तक घेतले आहे. तिचा स्वभाव खूप चांगला आहे. ती खूप हुशार आहे. मी तुम्हाला तिने केलेले पेंटिंग दाखवते. तिने हे पेटिंग स्वत: केले आहे. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तिने केले आहे.” त्यानंतर फराह म्हणाली की, ती खूप नशीबवान आहे. तसेच, ती हसत म्हणाली, “मी घरी गेल्यानंतर माझ्या मुलांना ओरडणार आहे.”
त्यानंतर सनीने फराहला निशाने बनवलेला Boo Box दाखवला. ती म्हणाली, “मुंबईतल्या बहुतेक मुलांसारखाच तिलाही धुळीची ॲलर्जी आहे. मला सगळीकडे टिश्यू पडलेले दिसायचे आणि मी तिला म्हणायचे की, आळशीपणा करू नकोस, टिश्यू उचल आणि कचरापेटीत टाक. तिला दररोज हा त्रास व्हायचा. एक दिवस मला दिसले की, तिने टिश्यू बॉक्सला टेपने एक डिस्पोजेबल कप जोडलेला होता. ते पाहिल्यानंतर मला ती खूप कौतुकास्पद गोष्ट वाटली.” याची किंमत ९९९ रुपये आहे. हा बॉक्स अमेझॉनसारख्या ऑनलाइन शॉपिंग वेब साईटवर उपलब्ध आहे.
यावर फराह कौतुकाने म्हणाली, “हे खूप छान आहे,” पुढे ती असेही म्हणाली, “माझ्या मुलांनीही असा काहीतरी शोध लावला पाहिजे.”
सनी हसत म्हणाली, “आता माझी दोन्ही मुले निशावर ईर्षा करतात. निशाकडे खूप पैसे असतील आणि त्यांना तिच्याकडून मागावे लागतील, असे त्यांना वाटते.” त्यावर फराह म्हणाली, “हो, कारण- ती अशा गोष्टी बनवत आहे, त्यामुळे तिच्याकडे भरपूर पैसे असतील.” त्यावर सनी म्हणाली, “ती १० वर्षांची असून, ती आधीच पैसे कमावत आहे.”
सनीच्या घरून जाताना फराहने सनी व तिच्या नवऱ्याचे कौतुक केले. ती म्हणाली की, तुम्ही दोघे खूप चांगले पालक आहात.
